Pegasus | पेगासस प्रकरणावरून संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा; म्हणाले – ‘मोदी सरकारच्या हातात देश असुरक्षित’

नवी दिल्ली : पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही या प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारला (Modi Government) धारेवर धरले आहे. पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दात प्रहार केले आहेत. संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून टाकणाऱ्या पेगासस प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. परंतु यासाठी सरकारकडे वेळ नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशा शब्दात संजय राऊंत यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला.

Pegasus | india not safe hands pm narendra modi says sanjay raut

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, संसदीय लोकशाहीवर केंद्र सरकारचा विश्वास नाही. सरकार सत्तेत आल्यापासून हे तुम्हाला जाणवत असेल. सरकारची जबाबदारी संसद चालवणे ही आहे. परंतु, त्यांना याची इच्छा नसल्याचे दिसते. पेगासस प्रकरणावर विरोधकांची मागणी साधी आहे. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की यावर संसदेत चर्चा व्हावी आणि त्यावेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावे. उरला प्रश्न तो न्यायालयीन चौकशी नेमायची का किंवा जेपीसी नेमायची हा नंतरचा विषय आहे, असेही राऊत म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित पेगासस हेरगिरी हा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी एकला पाहिजे. परंतु, सरकार त्यापासून पळ का काढत आहे? देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान इतक्या गंभीर विषयावर संसदेला तीन तास देऊ शकत नाही का? आम्ही केवळ तीन तास मागितले आहेत. देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकार तीन तास द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र असुरक्षित आहे, अशी टीका त्यांनी केली.

सरकार विरोधकांना या गोंधळास प्रवृत्त करतंय

सरकारकडून अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक संसद चालू देत नसल्याचा आरोप करण्यात येत
आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारलाच संसद चालू द्यायची नाही
त्यामुळे ते विरोधी पक्षांवर ठपका ठेवत आहेत. पेगासस प्रकरणावर सरकारला सत्य ऐकण्याची भीती
वाटते. पेगासस नाही तर कृषी कायदे असेल किंवा विरोध पक्ष हा जनतेचा आवाज असतो.
लोकशाहीत प्रत्येक सरकारला त्याचं ऐकणं बंधनकारक जरी असलं तरी केंद्रातलं सरकार त्या
संदर्भात सतत माघार घेत आहे. हे यापूर्वीही आपण पाहिलं असेल. सरकारच विरोधकांना गोंधळ
घालण्यास प्रवृत्त करतंय, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे दर

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली – ‘नको-नको म्हणत असतानाही करत रहायचा KISS’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pegasus | india not safe hands pm narendra modi says sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update