Pegasus द्वारे हेरगिरी करतंय सरकार, समोर आलेल्या पहिल्या यादीत 40 भारतीय पत्रकार; भीमा कोरेगाव-एल्गार परिषदप्रकरणात सुद्धा वापर

नवी दिल्ली : पेगासस (Pegasus) चा काळा पेटारा उघडला आहे. फ्रान्सची संस्था Forbidden Stories आणि अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल (Amnesty international) ने मिळून खुलासा केला आहे की, इस्त्रायली कंपनी NSO च्या स्पायवेयर पेगाससद्वारे जगभरातील सरकारे पत्रकार, कायदेतज्ज्ञ, नेते आणि इतकेच नव्हे तर नेत्यांच्या नातेवाईकांची सुद्धा हेरगिरी करत आहेत. या तपासाला ’पेगासस प्रोजेक्ट’ (Pegasus Project) नाव दिले आहे. या यादीत 50 हजार लोकांची नावे आहेत. जी पहिली यादी पत्रकारांची निघाली आहे त्यामध्ये 40 भारतीय नावे आहेत.

लीक झालेल्या लिस्टमध्ये हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदूच्या टॉप पत्रकारांचा समावेश आहे. यामध्ये हिंदूस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता, द वायरचे फाऊंडिंग एडिटर सिद्धार्थ वरदराजन आणि एम.के. वेणु, द वायरसाठी सातत्याने लिहिणार्‍या रोहिणी सिंह यांचे नाव आहे. लिस्टमध्ये एक मेक्सिकोचा पत्रकार Cecilio Pineda Birto ke चे सुद्धा नाव आहे ज्याची हत्या झाली आहे.

भारत सरकारने काय म्हटले?

भारत सरकारने ’पेगासस प्रोजेक्ट’चे (Pegasus Project) आरोप फेटाळले आहेत. सरकारने म्हटले की, सरकारी हेरगिरीच्या आरोपाचा ठोस पुरावा नाही. भारत एक मजबूत लोकशाही आहे, जी आपल्या सर्व नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी प्रतिबद्ध आहे. यापूर्वी सुद्धा भारत सरकारकडून WhatsApp वर पेगाससचा वापर केल्याचा दावा केला गेला होता. त्या रिपोर्टमध्ये सुद्धा काही सत्यता नव्हती. भारतीय सुप्रीम कोर्टात WhatsApp सह सर्व पक्षांनी त्याचे खंडन केले होते.

इस्त्रायली कंपनीच्या दाव्याला वादग्रस्त म्हटले

पेगासस सॉफ्टवेयर (Pegasus software) जगभरात इस्त्रायलची कंपनी NSO विक्री करते. कंपनीने ही लिस्ट वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. कंपनीने म्हटले की, लिस्ट त्यांच्या सॉफ्टवेयरच्या फंक्शनिंगसोबत जुळत नाही.

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल

Pegasus project reveals spyware used by govts to snoop jounalists politicians 40 indian names

द वायर आणि पेगासस प्रोजेक्टच्या पाटनर्सला कंपनीने एका पत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे विश्वास ठेवण्यासारखे कारण आहे की लीक झालेला डेटा तो नाही, ज्यास सरकारांनी पेगाससच्या वापराने टार्गेट केले आहे.

अनेक देशांत केले गेले हेरगिरीचे आरोप

मेक्सिकोच्या सरकारपासून सौदी अरब सरकारवर नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पेगाससच्या वापर केल्याचा आरोप झाला आहे. मेक्सिकोचे सरकार एनएसओचे पहिले ग्राहक असल्याचे म्हटले जाते. द वॉशिंगटन पोस्टचे कॉलमनिस्ट जमाल खशोगी यांच्या हत्येत पेगासस स्पायवेयरचे सुद्धा नाव आले होते.

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा उल्लेख

WhatsApp ने 2019 मध्ये एनएसओवर आरोप केला होता की, स्पायवेयर पेगाससचा वापर मे 2019 मध्ये जगभरात व्हॉट्सअपच्या 1400 यूजर्सला टार्गेट करण्यासाठी करण्यात आला. या लोकांमध्ये भारतातील अनेक मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, वकील आणि अ‍ॅक्टिव्हिस्ट यांचा समावेश आहे. ज्या 121 भारतीय नागरिकांची हेरगिरी झाली होती, त्यामध्ये भीमा कोरेगाव प्रकरणातील वकील निहाल सिंह राठोड, एल्गार परिषद केसमधील आरोपी आरोपी आनंद तेलतुंबडे, बस्तरच्या मानवाधिकार वकील बेला भाटिया, अ‍ॅक्टिव्हिस्ट सुधा भारद्वाज यांच्या वकील शालिनी गेरा यासारख्या लोकांचा समावेश आहे.

डिसेंबर 2020 मध्ये अल जजीराच्या अनेक पत्रकारांवर पेगाससद्वारे हेरगिरी करण्याचे वृत्त समोर आले होते.

कसे काम करतो पेगासस व्हायरस?

पेगासस स्पायवेयरद्वारे हॅकरला स्मार्टफोनचे मायक्रोफोन, कॅमेरा, मेसेज, ईमेल, पासवर्ड, आणि
लोकेशन सारख्या डेटाचा अ‍ॅक्सेस मिळतो. एका रिपोर्टनुसार, पेगासस तुम्हाला एन्क्रिप्टेड ऑडियो
स्ट्रीम ऐकणे आणि एन्क्रिप्टेड मेसेज वाचण्याची परवानगी देतो. म्हणजे हॅकर तुमच्या फोनच्या
जवळपास सर्व फिचरपर्यंत पोहचलेला असतो.

एनएसओ ग्रुपनुसार, हा प्रोग्राम केवळ सरकारी एजन्सीला विकण्यात आला आहे आणि याचा उद्देश
दहशतवाद आणि गुन्ह्यांच्या विरोधात लढण्याचा आहे. मात्र, अनेक देशांच्या सरकारांनी विरोधातील
लोकांची हेरगिरी करण्यासाठी याचा वापर केल्याचा आरोप होत आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | स्वस्त झाले सोने, चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Anil Deshmukh | दिल्ली दौऱ्यानंतर माजी गृहमंत्री Underground?; अनिल देशमुख कुठे आहेत त्यांचा ठावठिकाणा नाही?


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pegasus project reveals spyware used by govts to snoop jounalists politicians 40 indian names

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update