सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांकडून अभिनेत्री कंगना रणौतला ‘ही’ धमकी

मुंबई : वृत्तसंस्था – माझ्याशी शत्रुत्व घेऊ नकोस, असा इशारा निर्माते-दिग्दर्शक व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी अभिनेत्री कंगना रणौतला दिला आहे. कंगना रणौत हिने पहलाज निहलानी यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. तिच्या आरोपांनुसार, निहलानी यांनी अंतर्वस्त्रांशिवाय फोटोशूट करण्याबाबत सांगितल्याचा दावा तिने केला होता. तसेच कंगनाने माझ्यावर विनाकरण आरोप करणे बंद करावे नाहीतर तिच्यावर आरोप करण्यासाठी माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत असेही निहलानी म्हणाले आहेत.

कंगनाच्या आरोपांचं खंडन करताना पहलाज निहलानी म्हणाले की, ‘ज्याचा उल्लेख कंगना करतेय त्या फोटोशूटवर मी दीड कोटी रुपये खर्च केले होते आणि तीन गाण्यांचं चित्रीकरणही केलं होतं. याच फोटोमुळे तिला महेश भट्ट यांचा गँगस्टर हा चित्रपट मिळाला होता. त्यानंतर ती माझ्या चित्रपटातून बाहेर पडली होती. त्यावेळी तिने गँगस्टरमध्ये काम करण्यासाठी माझ्याकडे विनंतीही केली होती. त्यावेळी मी तिला त्याची परवानगी दिली होती. माझा चित्रपट हा एक यूथ फिल्म होती. यात काम करण्यासाठी मी अमिताभ बच्चन यांनाही विनंती केली होती. कंगना म्हणतेय तसा हा चित्रपट अश्लील नव्हता. मला तशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये रुचीही नाही. ‘त्यामुळे कंगनाने माझ्यावर उगाच आरोप करणं बंद करावे. ‘

कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिलाही बऱ्याच वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागल्याच सांगत धक्कादायक खुलासा केला होता.

Loading...
You might also like