हेल्मेट नसणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क येथील सेंट मिराज महाविद्यालयातील प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाईचा बडगा उगारला. पोलीस युक्तांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हेल्मेट सक्ती केली असताना पोलिसांनी अचानक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

कारवाई दरम्यान विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे विद्यार्थी संभ्रमात सपडले आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.पोलिसांनी कॉलेज परिसरात अचानक सुरु केलेल्या कारवाईमुळे परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची धांदल उडाली. पोलीस आयुक्तांनी एक जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  त्याची रंगीत तालीम वाहतूक पोलिसांनी सुरु केली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील सर्व शाळा-कॉलेजमध्ये पत्र पाठवून करावाई करणार असल्याचे सांगितेल आहे.

शाळा-कॉलेजांनी विद्यार्थ्यांना हेल्मेट वापरण्याची सुचना द्यावी, असेही पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी कॉलेज परिसरात पोलिसांनी कारवाई करुन विद्यार्थ्यांचे समुदेशन करण्यात येत आहे. मात्र, महाविद्यालयाकडे कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही कारवाई नेमकी का केली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थिनींकडे दुचाकी चालविण्याचे लायसन्स नसेल, तर दंड करणे अपेक्षित आहे. परंतु, सर्व शहरात हेल्मेटविना वाहनचालक फिरत असताना केवळ महाविद्यालयासमोरच कारवाई का केली जात आहे, असा सवाल विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे.