अस्वच्छता केल्यास लागणार दंड : मानवत नगर पालिका

मानवत : पोलीसनामा ऑनलाईन

शहर स्वच्छ व सुंदर दिसावे म्हणून मानवत नगरपालीके तर्फे तेथील स्थानिकांना आवाहन करण्यात येत आहे. जो अस्वच्छता करेल त्यास घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये दंडही आकारण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’176e2fd2-c551-11e8-9b5a-172201d53c4e’]

२०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षनामध्ये महाराष्ट्रातील इतर शहरांबरोबरच मानवत नगर पालिकेनेही सहभाग घेतला आहे. यासाठी नागरिकांना विविध प्रकारे आवाहनही करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वर्गीकृत करून दयावा, तसेच नागरी घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये ही जबाबदारी नागरीकांची आहे असेही सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरीकांनी व लाभार्थ्यांनी १०० टक्के शौचालयाचा वापर करावा. आपल्या शौचालयाचे बांधकाम पुर्ण करावे. जेणे करून उघड्यावर शौचास जाता येणार नाही.

विवेक तिवारी हत्येच्या पोस्टमार्टम अहवालात यूपी पोलिसांचं पितळ उघडं

तसेच नगर परिषद मानवतने शहरामध्ये ८ युनिट सार्वजनिक शौचालय व ४ युनिट सामुदायीक शौचालय उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा वापर नागरीकांनी करावा,हे शौचालय २४ तास उपलब्ध राहणार आहेत.

याचबरोबर प्लॉस्टीक कॉरीबॅगचा वापर करू नये करीबॅगची विक्री व वापरकेल्यास दंड आकारण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ अन्वये या तरतुदीचे पालन न करणा-या व्यक्तिस व संस्थाना दंड आकारण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B01AH488VQ,B01HJGT33W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9cd03191-c552-11e8-8378-4d12b7591738′]

तरतुदीचे पालन न केल्यास कसा असेल दंड –

  • रस्त्यांवर घाण केल्यास १८० रुपये
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये
  • उघड्यावर  लघुशंका केल्यास २०० रुपये
  • उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये

    अश्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार आहे असे मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऊमेश ढांकने, प्रशासकीय अधिकारी शाकेर अली, लेखाधिकारी यस.यल. बोरेवाड, नोडल अधिकारी नागेश कारभाजने, स्वच्छता निरीक्षक ओम चव्हाण यांनी सांगितले आहे.

    जाहीरात