बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या त्या ‘चोखंदळ’ महिलेला कोर्टाने केला ‘दंड’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेने आपल्या पुरुष सहकाऱ्यावर बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्या महिलेला दिल्ली उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायमूर्ती जे. आर. मिढा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दंडाची रक्कम हायकोर्टातील अ‍ॅडव्होकेट वेलफेअर ट्रस्टमध्ये जमा करण्याचा आदेश दिला आहे.

कार्यालयातील अंतर्गत विशाखा समितीने या प्रकरणातील पुरुषाला निर्दोष ठरविले होते. त्याविरुद्ध या महिलेने न्यायालयात अपील करुन त्याला सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, अशी मागणी केली होती.
या महिलेने आरोप केला होता की, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने २०११ मध्ये तिच्यावर लैगिक अत्याचार केला. या तक्रारीनंतर कार्यालयाने अंतर्गत समितीची स्थापना करुन तिच्या आरोपांची चौकशी सुरु केली. त्यावर या अधिकाऱ्याने खुलासा करताना सांगितले की, या महिलेच्या अनुपस्थितीत अधिकाधिक कामे निपटण्यात आल्यामुळे ही महिला नाराज होती. त्या ईर्षेतून तिने ही तक्रार केली आहे. समितीला या घटनेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे संशयाचा फायदा पुरुषाला देण्यात आला. त्याविरुद्ध या महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली.

उच्च न्यायालयाने समितीने केलेल्या चौकशीची सर्व माहिती तपासली. त्यानंतर या महिलेची तक्रार खोटी असल्याच्या निष्कर्षापर्यंत न्यायमूर्ती आले व त्यांनी खोटी तक्रार केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

Loading...
You might also like