मागवलं ‘पनीर’ आलं ‘बटर चिकन’ Zomato आणि पुण्यातील हॉटेलला दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे वकिल षण्मुख देशमुख हे ३१ मे २०१८ रोजी पुण्यात कामानिमीत्त आले होते. त्या दिवशी त्यांचा उपवास असल्याने त्यांनी Zomato वर पनीर ऑर्डर केली. मात्र, त्यांना पनीर ऐवजी बटर चिकन पाठवण्यात आले. तक्रार केल्यानंतर देखील पुन्हा बटर चिकन पाठवल्याने देशमुख यांनी पुण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे Zomato आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली होती.

या घटनेची गंभीर दखल घेत ग्राहक निवारण मंचाने झोमॅटो आणि प्रित पंजाबी स्वाद हॉटलेला ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम ४५ दिवसात ग्राहकाला देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दंडाची रक्कम देण्यास विलंब केल्यास १० टक्के जादा व्याज देण्यात यावे, असे आदेश ग्राहक निवारण मंचाने दिले आहेत.

काय आहे प्रकार
देशमुख हे पुण्यात कामानिमीत्त आले होते. त्यांचा उपवास असल्याने त्यांनी झोमॅटोवर पनीरची ऑर्डर दिली होती. मात्र त्यांनी बटर चिकन देण्यात आले. याबाबत त्यांनी झोमॅटोशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी त्यांना दुसरे जेवण पाठवत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्यावेळीही त्यांना बटर चिकन आल्याने देशमुख यांनी झोमॅटो आणि हॉटेलला नोटीस पाठवून धार्मिक भावना दुखावल्याचे सांगून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

मात्र नोटीसला उत्तर न दिल्याने त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. तक्रारीत त्यांनी नुकसान भरपाईपोटी पाच लाख आणि मानसिक त्रासाबद्दल एक लाख रुपये देण्याची मागणी केली. ग्राहक मंचाकडून Zomato आणि संबंधित हॉटेलवर कारवाई करत दोघांना ५५ हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळाले नसल्याचे झोमॅटोकडून सांगण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी