Pension Holders | हयात असल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ कॉल; एसबीआयचा पेंशनधारकांसाठी उपक्रम

पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँफ ऑफ इंडिया (State Bank of India), दरवर्षी सरकारी पेंशनधारकांकडून (Pension Holders) त्यांचा जिवंत असल्याचा पुरावा (Annual Life Certificate) घेत असते. त्यासाठी सर्व पेंशनधारकांना (Pension Holders) स्वतः बँकेतजावे लागत होते. पण आता या जाचातून त्यांची सुटका होणार आहे. एसबीआयने (SBI) ‘व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सर्व्हिस’ सुरू केली आहे, त्यामुळे आता ग्राहकांना हे काम व्हिडिओ कॉलद्वारे करता येणार आहे.

 

दरवर्षी, सरकारी पेंशनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान बँकेत सादर करावा लागतो. पेन्शनचा लाभ घेणारी व्यक्ती अद्यापही हयात आहे आणि त्याच्या नावाखाली दुसरा कोण तरी पेंशन घेत नाही हे पाहण्यासाठी, हा दाखला महत्त्वाचा आहे. त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे:

 

पहिल्यांदा पेंशनधारकांनी (Pension) ‘SBI pensions seva’ संकेतस्थळावर जायचे आहे. तिथे सर्वात वर असलेल्या ‘VideoLc’ लिंक वर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर अकाऊंट नंबर सबमिट करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला पेंशन येते तोच अकाऊंट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून आणि बाकीची माहिती भरायची आहे.

त्यानंतर तुमच्या खाते क्रमांकावर आधारित तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
यानंतर आवश्यक असलेला हयातीचा दाखला जमा करा आणि नेक्स्टवर क्लिक करा.
नव्या पेजवर तुमच्या सोयीनुसार व्हिडीओ कॉल अपॉईंटमेंट बुक करा.
त्यानंतर तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे कन्फर्मेशन येईल. तुम्ही दिलेल्या वेळेनुसार व्हिडीओ कॉलवर जोडले जा.
तुम्हाला बँक अधिकाऱ्यासमोर एक व्हेरिफिकेशन कोड वाचावा लागेल. तसंच पॅन कार्डही दाखवावं लागेल.
व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाचा कॅमरा होल्ड करा, जेणेकरून बँक अधिकारी तुमच्या चेहऱ्याचा फोटो काढेल.

 

अखेर तुमची माहिती रेकॉर्ड केल्याचं तुम्हाला एका मेसेजद्वारे समजेल.
त्यानंतर पेन्शन धारकांना एसएमएसद्वारे व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवेच्या बाबात माहिती दिली जाईल.

 

Web Title :- Pension Holders | sbi gift to pensioners now customers have not go every year to submit life certificate know details step by step procedure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police – API Suspended | पुण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक निलंबित, जाणुन घ्या कारण

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर

Afzal Khan Kabar | “ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर अफजल खानाचा…” पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाचें सचिवांना पत्र