Pension News | 23 वर्षानंतर वाढणार पेन्शनची रक्कम ? ‘या’ कामगारांसाठी गडकरी यांनी उठवला आवाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pension News | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी कोळसा क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शनमध्ये (Pension Of Coal Sector Workers) वाढ करण्याच्या मागणीबाबत कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी (Coal Minister Prahlad Joshi) यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांना केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळत असून गेल्या 23 वर्षांपासून त्यात कोणतीही सुधारणा केलेली नाही. (Pension News)

 

पत्र लिहून केली मागणी :
नितीन गडकरी यांनी कोळसा मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्तीसगडच्या ऑल इंडिया असोसिएशन ऑफ कोल एक्झिक्युटिव्हज (AIACE) ने मला कोळसा क्षेत्रातील कामगारांना प्रदान केलेल्या पेन्शनमध्ये सुधारणा आणि वाढ करण्याबाबत एक पत्र दिले आहे. रिव्हिजन न झाल्यामुळे अनेक कामगारांना गेल्या 23 वर्षांपासून एकच रक्कम पेन्शन म्हणून मिळत आहे. (Pension News)

 

अनेक कामगारांनी पेन्शनची रक्कम म्हणून केवळ एक हजार रुपये मिळत असल्याचा दावा केला आहे. गडकरींनी पत्रात लिहिले आहे की, श्रमिक संघटनांनी पेन्शन वाढीचा मुद्दा अनेक अधिकार्‍यांकडे उचलून धरला, मात्र आजतागायत त्यांना यश आलेले नाही. आपणास विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कामगारांना योग्य तो दिलासा द्यावा.

 

त्याचवेळी, एआयएसीईचा दावा आहे की निवृत्तीच्या वेळी एकदा निश्चित केलेल्या पेन्शनमध्ये अद्याप वाढ करण्यात आलेली नाही.

 

Web Title :- Pension News | bjp leader and union minister nitin gadkari seeks intervention on revision of pension for coal sector workers detail here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा