Pension News | 3 लाखपेक्षा जास्त पेन्शनरला सरकारकडून मोठी भेट, ‘या’ तारखेपासून वाढवली रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Punjab मध्ये 3 लाखापेक्षा जास्त पेन्शरसाठी खुशखबर आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Punjab Chief Minister Charanjit Singh Channy) यांनी अर्थ विभागा (Finance Department) ला 1 जुलै 2021 पासून 3 लाखापेक्षा जास्त पेन्शन धारकांना (Pension News) सुधारित पेन्शन देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य सरकारवर चालू आर्थिक वर्षात 1,887 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एका अधिकृत वक्तव्यानुसार, पंजाबच्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीं (recommendations of Sixth Pay Commission) नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pension News)

चन्नी यांनी रजा भरपगारी देणे आणि ग्रॅच्युएटीसारखे दुसरे लाभ देण्याचे सुद्धा निर्देश दिले. हा खर्च सुमारे सुमारे 915 कोटी रुपयांचा आहे. हे पैसे जानेवारी 2016 पासून 30 जून 2021 च्या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या 42,600 पेन्शनधारकांना दिले जातील. निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर एकुण 2,802 कोटी रुपयांचा भार येईल. मुख्यमंत्री म्हणाले की, सुधारित पेन्शन 1 जुलै 2021 पासून पेन्शनर्सला एकरकमी दिली जाईल. (Pension News)

सरकारने मोबाइल भत्ता सुद्धा वाढवला

सी आणि डी श्रेणी : 250 वरून वाढवून 500 रुपये

बी श्रेणी : 300 वरून वाढवून 600 रुपये

ए श्रेणी : 500 वरून वाढवून 1000 रुपये

प्रवासभत्ता सुद्धा वाढवला

सी आणि डी श्रेणी : 500 वरून वाढवून 1000 रुपये

बी श्रेणी : 750 वरून वाढवून 1500 रुपये

ए श्रेणी : 1000 वरून वाढवून 2000 रुपये

पंजाबच्या सरकारने सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याची घोषणा केली होती.

 

Web Title : Pension News | pension news punjabi pensioners will get more pension from 1st july 2021 medical allowance city allowance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’ ! मिळणार 8.33 % दिवाळी बोनस आणि ‘एवढया’ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

Indian Railways | खूशखबर ! मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; तब्बल ‘एवढ्या’ दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार

Vehicle Scrappage Policy | जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण करणं होणार महाग, द्यावे लागणार 8 पट जास्तीचे पैसे, जाणून घ्या