Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pension Scheme SWP | वृद्धत्वाची चिंता सर्वांना असते. अशावेळी, जर तुम्हाला सुद्धा तुमचे वृद्धत्व सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न ठेवायचे असेल तर तुम्हाला त्याची तयारी आतापासून सुरू केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला नोकरीच्या सुरूवातीच्या काळापासूनच गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. तुम्ही छोट्या गुंतवणुकीवर चांगली पेन्शन मिळवू शकता आणि आपले वृद्धत्व सुरक्षित करू शकता, असाच एक पर्याय जाणून घेवूयात. (Pension Scheme SWP)

SWP मधून पेन्शनची व्यवस्था
वृद्धत्वासाठी सेव्हिग्ज बनवण्यासाठी तुम्हाला एका अशा गुंतवणुकीची गरज आहे, ज्यामध्ये रिटर्न सुद्धा चांगले मिळेल आणि शेयर मार्केटची जोखीम सुद्धा कमी असेल.

सर्वांना माहित आहे की, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानमध्ये दर महिना काही रक्कम गुंतवली जाते. परंतु आम्ही याच्या अगदी उलट SWP म्हणजे सिस्टमॅटिक विद्ड्रॉल प्लानबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दर महिना रक्कम मिळेल, यास पेन्शन समजा.

कशाप्रकारे 20 वर्षापर्यंत दरमहिना 5 हजार रुपयांचा मासिक एसआयपी केल्यानंतर पुढील 20 वर्षापर्यंत तुम्ही दरमहिन्यासाठी 35 हजार रुपये पेन्शनची व्यवस्था करू शकता, ते येथे जाणून घेवूयात. (Pension Scheme SWP )

सिस्टमॅटिक विद्ड्रॉल प्लान (SWP)
सिस्टमॅटिक विद्ड्रॉल प्लान (systematic withdrawal plan) द्वारे गुंतवणुकदार एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड योजनेतून परत मिळवतात. किती वेळात किती पैसे काढायचे आहेत, हे गुंतवणुकदार स्वताच ठरवतो. SWP अंतर्गत हे पैसे रोज, विकली, मंथली, तिमाही, सहामाहीला किंवा वार्षिक आधारावर काढता येऊ शकतात. गुंतवणुकदाराला हवे असल्यास केवळ एक ठराविक रक्कम काढणे किंवा गुंतवणुकीवर कॅपिटल गेन्स काढू शकतात.

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान Systematic Investment Plan (SIP)
येथे एकदाच तुमचे पूर्ण पैसे ब्लॉक होत नाहीत. उलट यामध्ये तुम्ही तुमच्या सुविधेने मंथली गुंतवणूक करू शकता. सोबतच वेळोवेळी रिटर्नचे मूल्यांकन करून एसआयपी वाढवणे किंवा कमी करण्याची सुद्धा सवलत मिळते.

20 वर्षापर्यंत SIP

मासिक SIP – 5000 रुपये

कालावधी – 20 वर्ष

अंदाजित रिटर्न – 12 टक्के

एकुण व्हॅल्यू – 50 लाख रुपये

आता SWP साठी हे 50 लाख रुपये वेगवेळ्या योजनेत टाकले तर अंदाजित रिटर्न 8.5 टक्के असेल, आणि तुम्हाला मासिक 35 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

20 वर्षाची SWP
वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवणूक – 50 लाख रुपये

अंदाजित रिटर्न – 8.5 टक्के

वार्षिक रिटर्न – 4.25 लाख रुपये

मासिक रिटर्न – 4.25 लाख/12= 35417 रुपये

* SWP चे फायदे
एसडब्ल्यूपी रेग्युलर विदड्रॉल आहे. याद्वारे स्कीममधून युनिट्सचे रिडम्पशन होते.
जर ठरलेल्या वेळेनंतर सरप्लस पैसे झाले तर ते तुम्हाला मिळतात.
यामध्ये तसाच टॅक्स लागेल जसा इक्विटी आणि डेट फंडच्या बाबतीत लागतो.

 

जिथे होल्डिंगचा कालावधी 12 महिन्यांपेक्षा जास्त नाही.
तिथे गुंतवणुकदारांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो.
जर एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्ही त्यामध्ये एसडब्लूपी पर्याय अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात.

 

Web Title :- Pension Scheme SWP | pension scheme swp will give 35000 per month investing 5000 for 20 years in mutual funds know calculation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime | धक्कादायक ! वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तलाठ्याची आत्महत्या; सुसाईड करण्यापुर्वी लिहिली चिठ्ठी

Nora Fatehi Troll | नोरा फतेहीच्या टाॅपच्या अशा ठिकाणी होता कट, पाहून चाहते भडकले (व्हिडीओ)

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव