कामाची गोष्ट ! पेन्शनधारकांना ‘हा’ नंबर माहितीचं असणं खुपच गरजेचं, अन्यथा अडकू शकतात अकाऊंटमध्ये पैसे, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत येणार्या पेन्शनधारकांसाठी एक युनिक नंबर जारी करण्यात येतो, ज्याच्या मदतीने ते रिटायर्डमेन्टनंतर पेन्शन प्राप्त करू शकतात. या नंबरला पेन्शन पेमेन्ट ऑर्डर म्हटले जाते. कोणत्याही कंपनीतून रिटायर्ड होणार्या व्यक्तीस कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून पीपीओ नंबर जारी करण्यात येतो. रिटायर्डमेंट नंतर ईपीएफओ कर्मचार्यास एक लेटर जारी करते, ज्यामध्ये पीपीओच्या डिटेल्स असतात. जर एखाद्या व्यक्तीने आपला हो पीपीओ नंबर हरवल्यास बँक अकाउंटच्या मदतीने तो सहज मिळवता येतो. जाणून घेवूयात याची पद्धत…
जर तुम्ही पेन्शनधारक आहेत आणि तुमचा पीपीओ नंबर विसरला असाल तर या स्टेप्स फॉलो करून बँक अकाउंटच्या मदतीने तो मिळवू शकता.
1 यासाठी सर्वात आधी तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2 यानंतर तुम्हाला या वेबसाइटच्या डाव्या बाजूला जाऊन पेन्शन पोर्टलच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3 या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला Know Your PPO No. च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4 येथे तुम्हाला तुमचा तो बँक अकाउंट नंबर टाकावा लागेल जो तुमच्या पेन्शन फंडला लिंक्ड आहे.
5 बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीपीओ नंबर मेंबर आयडी आणि पेन्शन टाईपबाबत माहिती उपलब्ध होईल.
असाही मिळू शकतो पीपीओ नंबर
याशिवाय तुम्ही https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ही लिंक नवीन टॅबमध्ये उघडून तुमचा पीपीओ नंबर प्राप्त करू शकता. पीपीओ नंबर संबधित माहिती मिळवण्यासाठी ईपीएफओची वेगळी वेबसाइट आहे. येथे तुम्ही तुमचे जीवन प्रमाण पत्र, पीपीओ नंबर, पेमेन्ट संबंधी महिती आणि पेन्शनच्या स्टेटसबाबत माहिती मिळवू शकता.
का जरूरी आहे पीपीओ नंबर
एक पेन्शनधारक म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या पासबुकमध्ये पेन्शन पेमेन्ट ऑर्डर नंबर लिहिलेला असावा. अनेकदा असे होते की, पेन्शनधारकाच्या पासबुकमध्ये बँक कर्मचारी पीपीओ नंबरची नोंद करत नाहीत. कधीकधी एका बँकेतून दुसर्या बँकेत पेन्शन अकाउंट ट्रान्सफर केल्याने पासबुकमध्ये पीपीओ नंबर रहात नाही. यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पेन्शन जारी होण्यास उशीर होऊ शकतो.
याशिवाय, जर तुम्ही पेन्शनसंबंधी एखादी तक्रार ईपीएफओमध्ये नोंदवणार असाल तर त्यासाठी पीपीओ नंबर आवश्यक असतो. ऑनलाइन पेंशन स्टेटस जाणून घेण्यासाठी पीपीओ नंबर जरूरत असतो.