Pensioners साठी खुशखबर ! आता Life Certificate साठी घालावे लागणार नाहीत बँकेचे हेलपाटे, ‘या’ पध्दतीनं सहज मिळवा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पेन्शनर्स (Pensioners Life Cerficate) साठी एक चांगली बातमी आहे. आता त्यांना लाईफ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी बँकेच्या फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. पेन्शनर्सच्या सुविधेसाठी इंडिया पोस्टने एक दिलासादायक घोषणा केली आहे. या अंतर्गत आता कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला मिळवता येऊ शकतो. या घोषणेमुळे त्या पेन्शनधारकांना (Pensioners) दिलासा मिळेल ज्यांना वारंवार बँकेत जाणे अशक्य आहे.

इंडिया पोस्टची सर्व्हिस
इंडिया पोस्टने ट्विट करत ही माहिती देत म्हटले आहे की, वरिष्ठ नागरिक आता सहजपणे जवळच्या पोस्ट ऑफिसच्या सीएससी काऊंटरवर हयातीचा दाखला मिळवू शकतात. जीवन दाखल्याची अधिकृत वेबसाइट – jeevanpramaan.gov.in नुसार, जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पेन्शनर्सला व्यक्तिगत प्रकारे पेन्शन वितरण एजन्सीत जावे लागेल किंवा प्राधिकरणाद्वारे जारी जीवन प्रमाणपत्र प्राप्त करावे लागेल जिथे त्यांनी अगोदर सेवा केली होती आणि ते वितरण एजन्सीला द्यावे लागेल.

अशी आहे प्रक्रिया
अर्जासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाइल नंबरवरून 7738299899 वर एसएमएस पाठवून जवळचे जीवन प्रमाण केंद्राचे अपडेट घेऊ शकता. एसएमएससाठी टेक्स्ट ‘जेपीएलपिन कोड’ असेल. पेन्शनर्सला दिलेल्या पिन कोडवरून जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्रांची एक यादी मिळेल. ही यादी मिळाल्यानंतर जवळचे सेंटर निवडू शकता. तिथे जाऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवू शकता.

Web Title :- pensioners india post update pensioners can collect life certificate from any nearest post office know the process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी