Coronavirus : अमेरिकी सेनेकडून लिक झालेल्या कागदपत्रांव्दारे ‘कोरोना’च्या वॅक्सीनबद्दल धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटागॉनच्या मेमोने असा इशारा दिला आहे की, पुढील वर्षाच्या (2021) उन्हाळ्यापर्यंत (जून-जुलै) कोरोना लस उपलब्ध होणार नाही आणि यामुळे कोरोना विषाणू जगभरात अस्तित्वात असेल. तसेच, कोरोना विषाणूचा पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. मेमो लीक झाल्यानंतर हे उघड झाले आहे. माहितीनुसार, या मेमोवर कुणीही सही केलेली नाही. असे म्हटले जात आहे की, हा मेमो सेक्युरिटी ऑफ डिफेन्स मार्स इस्पारसाठी तयार करण्यात आला होता. अहवालानुसार, हे होमलँड डिफेन्स अँड ग्लोबल सिक्युरिटीचे असिस्टंस सेक्युरिटी ऑफ डिफेन्स कॅनेथ रॅपुआनो यांनी लिहिले आहे. दरम्यान, मेमोची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.

मेमोमध्ये असे लिहिले आहे की, सर्व माहितीवरून असे दिसते आहे की येत्या काही महिन्यांत जगभरात कोरोनाचे वातावरण पसरलेले असेल. लसीकरणाद्वारे प्रतिकारशक्ती व्यापक होईपर्यंत हे सुरूच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत सैन्यदलाबद्दल म्हटले गेले आहे की, आपल्यापुढे खूप मोठा रस्ता आहे. हे शक्य आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची पुनरावृत्ती देखील होऊ शकते.

लीक झालेल्या मेमोमध्ये म्हटले गेले आहे की, आपण पुन्हा आपल्या महत्त्वाच्या मोहिमेवर परत यायला हवे. क्रियाकलाप वाढविला पाहिजे आणि कोरोना पुन्हा न पसरण्यासाठी आवश्यक तयारी केली पाहिजे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूची 1,528,566 हून अधिक प्रकरणे समोर आली असून 91,921 लोकांचा मृत्यू झाला आहे.