Coronavirus : लोकांनी ’ऑक्सीजन’ घेण्यासाठी शोधून काढला देशी उपाय, 2000 रुपयात मिळतोय ताजा ’प्राणवायु’

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ’ऑक्सीजन’च्या टंचाईने लोकांना धडा दिला आहे. लोक आता सतर्क झाले आहेत आणि त्यांनी घरात ’ऑक्सीजन’ घेण्यासाठी नैसर्गिक पद्धत अवलंबली आहे. मात्र दोन हजार रुपयात संपूर्ण कुटुंबाला ताजा ’प्राणवायु’ मिळतो. दावा केला जात आहे की, नासाने अनेक अशी रोपे घरात लावण्याची शिफारस केली आहे, ज्यामधून भरपूर प्रमाणात ऑक्सीजन मिळतो. या झाडांद्वारे घरातील हानिकारक गॅसचा प्रभाव नष्ट करता येऊ शकतो. यामुळेच देशात लॉकडाऊन किंवा कर्फ्यू लागलेला असूनही ’नर्सरी’चा व्यवसाय मागील दिड महिन्यात 50 टक्के वाढला आहे.

इंडियन नर्सरीमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष वाय. पी. सिंह म्हणतात, असे समजा की, एखाद्या नर्सरीवर एका दिवसात अडीचशे ग्राहक येत आहेत, त्यांच्यापैकी 150 नवीन ग्राहक आहेत. म्हणजे जे पहिल्यांदा नर्सरीत येत आहेत. प्रत्येक ग्राहकाचा फोकस ’ऑक्सीजन’ देण्यार्‍या झाडांवर असतो. असोसिएशन आता या दिशेने काम करत आहे की, होम आयसोलेशन किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल लोकांना ऑक्सीजन देणारे एक झाड भेट द्यावे.

वाय. पी. सिंह म्हणाले, ऑक्सीजनबाबत लोकांमध्ये सध्या जी क्रेज आहे, ती अगोदर कधीही दिसली नाही. दिल्ली सारख्या मेट्रो शहरात दिवाळीच्या आसपास जेव्हा प्रदूषण होते तेव्हा सुद्धा काही लोकांना ऑक्सीजन प्लांटची आठवणे येते. सामान्य माणूस प्यूरीफायर खरेदी करू शकत नाही. त्याचा पर्याय घरात लावली जाणारी ऑक्सीजन देणारी झाडे आहेत.

दावा केला जात आहे की, नासाने जी प्लांट घरात लावण्याची शिफारस केली आहे, त्यामध्ये मनी प्लांट्स, पीस लिली, स्नेक प्लांट, रबर प्लांट, स्पायडर, एंथूरियम, इंग्लिश आयव्ही, बाम्बू पाम, एरेका पाम आणि बोस्टर्न फर्न इत्यादीचा समावेश आहे. हे प्लांट्स घरात कुठेही ठेवता येतात. अगोदर गावांमध्ये पिंपळ आणि वडाची झाडे वातावरण शुद्ध ठेवत असत. आता या झाडांसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.