KiKi नंतर आता Nillu Nillu चॅलेंजचे खूळ 

कोच्ची : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर किकी चॅलेंजच खुळ वाढल होत. आता पुन्हा एक नवीन चॅलेंज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या सोशल मीडियावर Nillu Nillu चॅलेंजने तरूणाईला वेड लावलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता विष्णु उन्नीकृष्णन यानेदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे. केरळमध्ये गल्लीबोळात तरुण समोरून येणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्यासोबर डान्स करताना दिसत आहेत.हे चॅलेंज 2004 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून प्रेरित आहे. या चित्रपटात ‘Rain Rain Come Again’. Nillu Nillu असे गाणे होते.
काय आहे Nillu Nillu चॅलेंज
रस्त्यावर धावणाऱ्या गाडीला अडवून त्यांच्यासोबर डान्स करतात. डान्स करताना हातात झाडाच्या फांद्या आणि डोक्यावर हेल्मेट असते.
कशी झाली सुरूवात ?
हे चॅलेंज 2004 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून प्रेरित आहे. या चित्रपटात ‘Rain Rain Come Again’. Nillu Nillu असे गाणे होते. या गाण्यावरच हेल्मेट घातलेले तरुण हातात फांद्या घेऊन गाड्यांना अडवत त्यांच्यासमोर डान्स करत आहेत. आता तरूण त्याच प्रकारे अनुकरण करत चॅलेंज करत आहेत.
या चॅलेंजने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने हा चॅलेंज धोकादायक असून यामुळे रस्ते दुर्घटना होण्याची शक्यताच अधिक आहे. यामुळे नागरिकांनी हा चॅलेंज स्वीकारणे व एखाद्याला देणे तातडीने बंद करावे, असे आवाहन केरळ पोलिसांनी जनतेला केले आहे.
काय होते  किकी चॅलेंज ?
 चालत्या गाडीतून खाली उतरुन डान्स करायचा आणि तसेच पुन्हा गाडीत बसायचे असे किकी चॅलेंज दिले जाते. या किकी चॅलेंजचे व्हिडीओ काढून  सोशल मिडीयावर शेअर करायचे.