सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘या’ मोठ्या आजाराला बळी पडतात ‘या’ ब्लड ग्रुपचे लोक, रहा सांभाळून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात, आणि त्यांचे वेगवेगळे ब्लड ग्रुप सुद्धा असतात. ब्लडग्रुप 4 प्रकारचे असतात – ए, बी, एबी आणि ओ. प्रत्येक ग्रुप आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो, ज्यामुळे ब्लडग्रुप चार वरून वाढून आठ होतात.

जगात अनेक गंभीर आजार आहेत. ज्यामध्ये डायबिटीज एक आहे. डायबिटीजला सायलेंट किलर सुद्धा म्हटले जाते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (सीडीसी) नुसार, हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रूग्णाला आपल्या जीवनशैलीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते.

जीवनशैलीशिवाय सुद्धा इतर अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुम्हाला टाइप 2 डायबिटीज होऊ शकतो. ज्यामध्ये एक आहे तुमचा ब्लड ग्रुप. युरोपियन असोसिएशनच्या जर्नल डायबिटोलॉजियामध्ये 2014 मध्ये प्रकाशित एका स्टडीनुसार, नॉन ओ ब्लड ग्रुपच्या लोकांना टाईप-2 डायबिटीज होण्याचा धोका ‘ओ’ ब्लड ग्रुपवाल्या लोकांच्या तुलनेत जास्त असतो. याबाबत एक स्टडी करण्यात आला ज्यामध्ये सुमारे 80,000 महिलांना सहभागी करण्यात आले होते.

यापैकी एकुण 3,553 महिला टाईप-2 डायबिटीजला बळी पडल्याचे आढळले. नॉन-ओ ब्लड ग्रुपच्या महिलांमध्ये हा आजार होण्याचा धोका जास्त आढळला. अभ्यासात आढळले की ‘ए’ ब्लड ग्रुपवाल्या महिलांमध्ये टाईप-2 डायबिटीज होण्याची शक्यता ‘ओ’ ब्लड ग्रुपच्या महिलांपेक्षा 10 टक्के जास्त होती. मात्र, यामध्ये सर्वात जास्त धोका ‘बी’ ब्लड ग्रुपच्या महिलांमध्ये दिसून आला.