अयोध्येत पोहोचल्यानंतर ‘या’ समाजाच्या 17 जिल्ह्यांतील लोकांनी सांगितलं ‘आम्ही श्रीरामाचे वंशज’ !

अयोध्या : वृत्तसंस्था – अयोध्येला श्रीरामाचे जन्मस्थळ मानले जाते. आजकाल अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी विविध संघटनांकडून पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे अयोध्या नेहमी चर्चेत असते. अशीच अयोध्या नगरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणजे, अखंड रघुवंशी समाजाने आम्ही श्री रामाचे वंशज असल्याचा दावा करणारे निवेदन राष्ट्रपती यांना सादर केले आहे.

हजारोंच्या संख्येने रघुवंशी समाज अयोध्येत दाखल
मध्यप्रदेश मधून हजारोंच्या संख्येने आलेले इक्षाकू वंशीय रघुवंशी समाजच्या लोकांनी आज श्री रामललाचे येथे दर्शन केले. या समाजाची अशी मागणी आहे की, राम मंदिर निर्माण मधील अडचणी दूर करून लवकरात लवकर राम मंदिर निर्माण केले जावे. दरम्यान रघुवंशी समाजाद्वारे सर्वोच्च न्यायालयात रामाचे वंशज होण्यावरून वेगवेगळी मते समोर आली आहेत. रघुवंशी समाजातील एक वर्ग सर्वोच्च न्यायालयात रामाचे वंशज असल्याचा दावा करणार नाही. तर त्याच ठिकाणी रघुवंशी समाजातील दुसरा वर्ग श्री रामाचे वंशज असल्याचा दावा करत आहे. आज सकाळी अयोध्येच्या रस्त्यांवर वातावरण जरा गरम असल्यासारखे होते. मध्यप्रदेशातून आलेल्या लाखोंच्या रघुवंशी समाजाने मोठ्या गाजावाजात आणि मोठ-मोठे जय श्रीराम चे नारे देत श्री रामलला चे दर्शन केले. यादरम्यान जिल्ह्यात प्रसार माध्यमे सक्रिय दिसून आली.

रघुवंशी समाजाकडून मंदिर निर्माण करण्याची मागणी
अयोध्येत श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अखंड रघुवंशी समाजाच्या लोकांनी असा दावा केला की, “आम्ही श्री रामाचे वंशज आहेत”. सर्वोच्च न्यायालयाने श्री रामाच्या वंशजांबद्दल विचारणा केली असता त्यांना नाईलाजाने समोर यावे लागले होते. रघुवंशी समाजाने जिल्हाधीकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन सादर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपण श्री रामाचे वंशज असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी राम मंदिर निर्माण करण्यामधील सर्व अडचणी दूर करून लवकरात लवकर राम मंदिर निर्माण केले जावे. अशी मागणी केली आहे.

श्री रामाचे वंशज असल्याचे दावे-प्रतिदावे
रघुवंशी समाजातील एक वर्ग श्री रामाचे वंशज असल्याचा दावा करतो तर दुसरा वर्ग असा दावा करू नये अशा मताचा आहे. त्यांचे असे मानने आहे की, त्यांनी जर असा दावा केला सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या केस वर त्याचा प्रभाव पडू शकतो. रघुवंशी समाजासोबत अयोध्येतील संत समाज सुद्धा जडला गेला आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like