Coronavirus : हाताचे ‘चुंबन’ घेऊन ‘उपचार’ करणाऱ्या बाबाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू, 29 भक्तही ‘पॉजिटीव्ह’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या साहाय्याने धार्मिक कर्माने निरपराध लोकांचे रोग आणि समस्या दूर करणारे बाबा तुम्हाला आजारही देऊ शकतात. मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये असे घडले आहे, जेव्हा एका संक्रमित बाबामुळे त्याच्या भक्तांना कोरोना झाला. अशाच एका बाबाचा ४ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रशासनाने बाबाच्या संपर्कांत आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन केले. जेव्हा यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, तेव्हा शहरात कोरोनाचा स्फोट झाला. या बाबाने आपला मृत्यू होण्यापूर्वी २९ लोकांना कोरोना वाटला.

रतलामच्या नयापुराचा हा बाबा जादूटोणा करत असे आणि ताबीज देत असे. लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे जात असत आणि तो कधीकधी लोकांच्या हाताचे चुंबन घेत असत. या बाबाच्या संपर्कात आलेल्या इतर आणखी लोकांचा प्रशासन शोध घेत आहे. या बाबामुळे मिळालेले कोरोना पॉझिटिव्ह शहरातील बाबाचे निवासस्थान नयापुरा भागातील आहेत. नयापुरा शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. शहरात एका बाबामुळे कोरोना पसरला, तर प्रशासनाने शहरात अशा बाबांचा शोध घेण्यास सुरवात केली. जवळपास २९ बाबा पकडले असून त्यांना विविध क्वारंटाइन केंद्रात पाठवले आहे.

क्वारंटाइन केंद्रात या बाबांची तक्रार आहे की, त्यांना येथे कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांची तपासणी देखील झालेली नाही. कोरोना महामारीमुळे त्यांनी सर्व काम थांबवले होते, असे या बाबांचे म्हणणे आहे. आम्हाला पकडून येथे बंद केले आहे. रतलामचे सीएमएचओ डॉ. प्रभकार ननावरे यांनी सांगितले की, नयापुरा येथील एका बाबाचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला होता. त्या बाबाशी संपर्कात आलेल्या लोकांना शोधून क्वारंटाइन केले गेले आहे. नमुने तपासणीसाठी पाठवले असता, नयापुराच्या या बाबाशी संपर्क साधलेले २९ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशा आणखी बाबांना पकडून क्वारंटाइन केले आहे. सर्वांना सर्व सुविधा देण्यात येत असून त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.