‘हा’ एक आगळा-वेगळा क्लब, इथं लोक ‘ढसा-ढसा’ रडतात, ‘हे’ आहे कारण, जाणून घ्या

गुजरात : वृत्तसंस्था – लोक आनंदी होण्यासाठी काय करत नाहीत ? पैसे मिळवणे, व्यायाम करणे , मोठ्याने हसणे इत्यादी गोष्टी लोक आनंदी आणि सुखी होण्यासाठीच करतात. पण गुजरातमध्ये अशीही एक जागा आहे जिथे लोक मोठ्याने ओरडण्यासाठी आणि रडण्यासाठी एकत्र जमतात. दरम्यान, गुजरातच्या सुरतमध्ये असा एक क्लब आहे, जिथे लोक फक्त रडण्यासाठी येतात. येथे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र जमतात आणि यातील प्रत्येकजण रडतो.
Crying Club
रडण्याचे ‘हे’ फायदे असल्याचा दावा :
क्राईंग क्लबच्या नावाने सुरू असलेला हा क्लब कमलेश भाई मसालावाला हे चालवत आहेत. याठिकाणी ते लोकांना रडण्याची प्रेरणा देतात. एवढेच नाही तर ते म्हणतात की हसण्यापेक्षा रडणे अधिक महत्वाचे आहे आणि ते याचे कारण देखील स्पष्ट करतात. ते म्हणतात की रडण्याने शरीर हलके होते, शरीरातल्या सर्व निरुपयोगी गोष्टी अश्रूंच्या रूपात बाहेर येतात. असे अनेक फायदे ते सांगतात. या क्लबमध्ये लोकांची मोठी गर्दी असते. येथे येणारे लोकही रडायला आवडते असे म्हणतात. म्हणूनच ते याठिकाणी गर्दी करतात.
Crying club
क्लबमध्ये लोक जमल्यानंतर प्रथम कमलेश भाई मसालावाला थोड्या काळासाठी येथे लोकांशी संवाद साधतात. हे ऐकून नंतर प्रत्येकजण आपापल्या आसनावर बसून रडण्यास सुरवात करतो. याठिकाणी काही लोक रडताना एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडतात. युवक आणि युवतीची मोठ्या संख्येने येथे येत असतात.
Crying Club
येथील फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईल की लोक कशा प्रकारे मनसोक्त रडत असतात. या क्लबमध्ये रोज सकाळी लोक येतात आणि रडण्याचा कार्यक्रम होतो.
Crying Club

visit : Policenama.com