5G नेटवर्क टेस्टिंगने होतोय लोकांचा मृत्यू, कोरोना तर आहे एक बहाणा? जाणून घ्या वायरल Audio चे सत्य

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरस ज्या वेगाने वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने त्याच्याशी संबंधीत अफवा पसरत आहेत. कोरोना विरूद्धच्या युद्धात सर्वात मोठी अडचण तर अफवा आहेत, ज्यांना लोक खरे समजत आहेत आणि कोरोना विरूद्धची लढाईल कमजोर पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक ऑडिओ खुप वेगाने वायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारतामध्ये सध्या जेवढे मृत्यू झाले आहेत त्यांचे कारण 5 जी नेटवर्कची टेस्टिंग आहे आणि त्यास कोरोनाचे नाव दिले जात आहे. यात दावा केला आहे की, या टेस्टिंगची माहिती सर्वांना दिली गेलेली नाही आणि या कारणामुळे लोकांचे मृत्यू अचानक होत आहेत.

मात्र, जेव्हा या वायरल ऑडियोची पडताळणी करण्यात आली तेव्हा हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे आढळले. पीआयबी फॅक्ट चेक टीमने सोशल मीडियावर वायरल या दाव्याल बनावट म्हटले आहे. पीआईबीने लिहिले आहे, एका ऑडियो मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, राज्यांमध्ये 5जी नेटवर्कची टेस्टिंग केली जात आहे ज्यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे आणि यास कोविडचे नाव दिले जात आहे.

मात्र, पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमला आढळले की, हा दावा बनावट आहे. सोबतच टीमने लोकांना विनंती केली की, कोरोना काळात कृपया असे संदेश शेयर करून संभ्रम पसरवू नका. या वायरल ऑडियामध्ये दोन लोकांचा संवाद ऐकायला येतो, ज्यामध्ये एक व्यक्ती कोरोनामुळे होणारे मृत्यू 5जी टेस्टिंगमुळे होत असल्याचे सांगत आहे. तो या ऑडियोमध्ये म्हणतो या कारणामुळे लोकांचा घसा कोरडा पडत आहे, आणि त्याने दावा केला आहे की, मे पर्यंत याचे टेस्टिंग होईल तेव्हा मृत्यूसुद्धा थांबतील.

परंतु, हकीकत ही आहे की कोरोनाने होत असलेले मृत्यू आणि 5जी नेटवर्कचे टेस्टिंग यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. कुठूनही असा शास्त्रीय दावा नाही. यासाठी कुणीही अशाप्रकारचे संदेश फॉरवर्ड करू नये.