‘टकाटक’ लुकसाठी महिला करतात ‘रायनोप्लास्टी’, ‘या’ 8 खास गोष्टी जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महिलाच नव्हे, तर पुरूषसुद्धा सौंदर्याच्या बाबतीत खूप जागारूक असतात. परंतु, महिला सौंदर्याच्या बाबतीत खुपच अलर्ट असतात. वेळच्यावेळी त्या आपल्या चेहर्‍याची काळजी घेत असतात. परंतु, काहीवेळा चेहर्‍याचा एखादा भाग असा असतो ज्यामुळे सौंदर्यात बाधा येते. औषध, गोळ्या, घरगुंती उपायांनी ही समस्या दूर करता येत नाही. विशेषता नाकाच्या बाबतीत ही समस्या जास्त जाणवते. अशावेळी सुंदर लुक येण्यासाठी नाकामध्ये असलेले दोष दूर करण्यासाठी रायनोप्लास्टीसारखी सर्जरी केली जाते. इराणमध्ये ही सर्जरी मोठ्याप्रमाणात केली जाते. रायनोप्लास्टीचा वापर करून तारूण्य टिकवता येते.

अशी केली जाते सर्जरी

1  रायनोप्लास्टी सर्जरीमध्ये नाक कापून लहान करण्यात येते. यात नाकाचे टोक किंवा मधला उंचवटा कापून चेहरा सुंदर करण्यासाठी सर्जरी केली जाते.

2  या सर्जरीनंतर चेहरा आकर्षक दिसतो. ही अत्याधुनिक आणि वैज्ञानिक पद्धत आहे. ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे.

3  सर्जरीने नाकाचा आकार लहान करता येतो. पसरलेल्या नाक नोजट्रिल्स, नुकीली टिप, नासल ब्रिजवर आकार दिला जातो.

4  नाकाला रिशेप करताना लहान, सपाट नाकाला गोल करण्यात येते. यामुळे नाक आधीपेक्षा चांगलं दिसतं.

5  राइनोप्लास्टीने चेहर्‍यावरच्या इतर फिचर्स सोबत संतुलित करता येते.

6  या सर्जरी नंतर त्याच दिवशी घरी जाऊ शकता. नाकाला काही दिवस बॅडेज असते. आठ ते दहा दिवसांनी ते काढता येते.

7  फायनल रिजल्ट दिसण्यासाठी 1 वर्ष लागते. नोज रिशेपिंगनंतर नाक आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाला सूज आलेली असते. ती हळूहळू कमी होते. एका आठवड्यात नोज टिपचं स्वेलिंग ठिक होतं.

8  पूर्ण फरक 10 ते 12 महिन्यांच्या कालावधी नंतर दिसतो.