लॉकडाऊनमुळे शरीरावर झाले ‘हे’ 8 चांगले परिणाम, कमी झाले ’या’ आजाराचे रुग्ण : रिसर्च

पोलिसनामा ऑनलाइन – देशभरात लॉकडाऊनचे गंभीर असे आर्थिक परिणाम समोर येत असले तरी काही चांगले परिणाम देखील समोर येत आहेत. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे लोक अनेक महिने घरात बसून होते. आजही खुप कमी प्रमाणात लोक घराच्या बाहेर पडते आहेत. विविध आजारांवर उपचार करून घेणे सुद्धा लोकांना या काळात अवघड झाले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बसल्याने लोकांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा हेल्दियंसच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कॉलेस्ट्रॉलची वाढ होत असलेल्या लोकांमध्ये 22.3 टक्क्यांनी कमतरता झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.

असा केला रिसर्च
2020 च्या पहिल्या 3 महिन्यात आणि 2029 त्या शेवटच्या 3 महिन्यांत 50 हजारांपेक्षा जास्त लोकांवर करण्यात आला होता. या अभ्यासानंतर महिला आणि पुरूषांमधील आकडेवारीचे विश्लेषण केले गेले.

रिसर्चमधील महत्वाचे मुद्दे
1 महिलांच्या तुलनेत जास्त वयाच्या पुरूषांच्या हृदयाच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली.
2 हृदयासंबंधी समस्या असलेल्या महिलांमध्ये 17.2 टक्के तर पुरूषांमध्ये 25.5 टक्के कमतरता दिसून आली. लॉकडाऊनमुळे हे झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
3 लॉकडाऊनमध्ये लोक जंक फूड, फास्ड फूड, तळलेल्या पदार्थांपासून दूर होते.
4 खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतही बदल घडून आल्याने हृदयाचे आरोग्य सुधारले.
5 वीस, तीस आणि चाळीस वर्षातील लोकांच्या तुलनेत 50 आणि यावरील वयोगटातील लोकांमध्ये हृदयासंबंधी समस्याचे प्रमाण कमी झाले.
6 कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात आल्याचे दिसेल.
7 अमृतसर, कानपुर आणि जालंधर या शहरात हृदयासंबंधी समस्यांमध्ये घट आढळली.
8 लहान शहरांमध्येही हृदयाच्या आजारांमध्ये कमतरता दिसून आली आहे.