‘या’ कारणामुळे ‘अस्वस्थ’ पाकिस्तानचा भारतातील लोकसभा निकालावर ‘वाॅच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आता सर्वांचे लक्ष निकालावर आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या निकालाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानचे विशेष लक्ष आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर येऊ नये असे पाकिस्तानातील नागरिकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमधील राजकीय पक्ष, लष्कर आणि आयएसआय यांना भारतात कोणाचे सरकार सत्तेत येणार याबद्दल उत्सुकता आहे.

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतात भाजपचे सरकार नको असे वाटत आहे. यासंबंधीच्या बातम्या पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होत आहेत.

याविषयी बोलताना, पाकिस्तान मधील नागरिक शाही आलम म्हणाला कि, मोदी पुन्हा सत्तेत येऊ नयेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्रईक केला होता. तर ऐजाजच्या मते, भारतात पुन्हा मोदीच सत्तेत येणार. पण त्यांना बहुमत मिळणार नाही. ही गोष्ट पाकिस्तानसाठी नक्कीच चांगली आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांची मात्र वेगळी इच्छा
याविषयी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना विचारले असता त्यांनी म्हटले होते कि, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चा सुरु करण्याची चांगली संधी निर्माण होईल.

परदेशी पाकिस्तानी नागरिक
परदेशात राहणारे पाकिस्तानी नागरिक मात्र मोदींच्या बाजूने असल्याचे दिसून येते. मोदी पुन्हा भारतात सत्तेवर आल्यावर पाकिस्तानच्या भूमीवरून चालणाऱ्या दहशहतवादी कारवायांना आळा बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

You might also like