कोणाच्या हातात काय आहे, हे जनतेला माहिती आहे, फडणवीसांचा CM ठाकरेंना चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मी कार आणि सरकार (Government) दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे, मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र मुख्यमंत्र्याचे हे विधान त्यांच्या मित्र पक्षांसाठी असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कारचे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. ते सगळ सत्तेत सोबत बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते सांगत असतील. जनतेला माहीत आहे कोणाच्या हातात काय आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्याच्या विधानावर फडणवीस यांनी फलटवार केला आहे.

स्टेअरिंग माझ्याकडे आहे, हे आम्हाला सांगून काय फायदा?, कोणाच्या हातात स्टेअरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे एक्सिलेटर आहे, हे जगाला माहित आहे. कोण कधी ब्रेक लावत, कोण एक्सिलेटर वाढवत, खरे म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, माझ्या हातात कार आणि सरकार दोन्ही आहे. मुख्यमंत्र्यांनी कार चालवण सोप असत. कारण, मुख्यमंत्री आल्यानंतर ट्रॅफिक थांबलेल असत. पण, इथे समस्यांचा ट्रॅफिक सुरु असतो. त्यावेळी, कोणी मित्र ब्रेक लावतात, कोणी एक्सीलेटर वाढवतात, मग कुणी आपल्याच हातात स्टेअरिंग असल्याची घोषणा करते असे म्हणत फडणवीस यांनी चिमटा काढला.
दरम्यान भाजपकडून वारंवार होणारी टीका, नामांतरामुळे सत्तेत असलेल्या पक्षासोबत सुरू असलेले वाकयुद्ध या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान अतिशय सूचक मानले जात आहे.