‘शरजील इमामसारख्या लोकांना चौकात उभे करून गोळ्या घातल्या पाहिजेत’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात (सीएए) भडकाऊ भाषण देणारा तसेच आसाम भारतापासून वेगळे करण्याची भाषा करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) विद्यार्थी शर्जील इमाम विरुद्ध भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘शरजील इमामसारख्या लोकांना चौकात उभे करून गोळ्या घातल्या पाहिजेत,’ असं वक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार संगीत सोम यांनी केलं. दरम्यान, सोम हे मेरठ जिल्ह्यातील सरधना मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत.

दरम्यान, २५ जानेवारी रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठात शरजील ने भडकाऊ भाषण केलं होतं. यावेळी त्याने आसामला भारतापासून तोडण्याचा इशारा दिला होता. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर फरार झालेल्या शरजील बिहारच्या जेहानाबाद येथून पोलिसांनी अटक केली. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. याच मुद्यावरून भाजप आमदार संगीत सोम यांनी शरजीलवर निशाणा साधत म्हंटले कि, ‘देश तोडण्याची भाषा करणाऱ्याला लोकांनी भर चौकात फासावर लटकवून गोळ्या घातल्या पाहिजेत. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत माफ करता कामा नये,’

‘या’ बायकांना काही कामधंदा नाही !
शरजीलसोबतच सीएए विरोधात शाहीन बागमध्ये आंदोलन करणाऱ्यांवरही सोम यांनी टीका केली. ‘इथं ज्या महिला बसल्या आहेत, त्यांना काही कामधंदा नाही. त्यांना राजकीय पक्षांकडून निधी मिळतो, तसेच परदेशातूनही पैसा येतो आणि हा पैसा त्या इथं बसून खातात. त्यांना या कायद्याबद्दल काडीचीही माहिती नाही. ज्या दिवशी या लोकांची चौकशी होईल, त्या दिवशी दिल्ली असो, बरेली असो, देवबंद असो की लखनऊ. यांच्याविरोधात खटले दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवले जाईल,’ असा दावा सोम यांनी केला. मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलींत त्यांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.