‘ते’ वृद्धत्वावर करतात मात, 60 व्या वर्षी ‘आई’ बनतात महिला, वयाची गाठतात ‘शंभरी’

जालंधर (सोमनाथ) : जगातील सहा अशा ठिकाणांचा शोक लागला आहे, जेथे लोक सर्वात जास्त वर्षे जगतात. ही माहिती जेआय रोडेल यांचे पुस्तक द हेल्दी हुंजास आणि डॉन ब्यूटनर यांच्या ब्ल्यू झोन्स या पुस्तकातून मिळते. द हेल्दी हुंजास पुस्तक पाकिस्तानच्या किलगिट-बलिस्थानच्या अभ्यासावर अधारित आहे. तर ब्ल्यू झोन्स यूरोप, जपान आणि अमेरिकेच्या पाच अशा ठिकाणांच्या अभ्यासावर अधारित आहे जेथे लोक दिर्घआयुष्य जगतात. किलगिट-बलिस्थान येथील केहुंजा समाजाचे लोक 120 वर्षांपेक्षा जास्त जगतात. तर महिला 60 वर्षांच्या वयातही माता बनतात.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये साकारी मोमोई यांचे नोंद झालेले नाव याचे प्रत्यक्ष उदारहरण आहे. साकारी मोमोई यांचे 5 जुलै 2015 रोजी टोकीयोच्या एका रूग्णालयात 112 व्या वर्षी निधन झाले. मोमोई हे टोकीयोजवळील सेटामा येथे राहत होते. त्यांना 2014 मध्ये जगातील सर्वात जास्त वृद्ध व्यक्ती जाहीर करण्यात आले. यापूर्वी एप्रिल 2015 मध्ये जगातील सर्वाधिक वृद्ध महिला मिसाओ ओकावाचे 117 व्या वर्षी निधन झाले. ती जपानच्या ओसाक येथे राहणारी होती.

ब्ल्यू जोन्स काय आहे
ब्ल्यू झोन्स एक अवैज्ञानिक शब्द आहे, जो भौगोलिक क्षेत्रांना दिला जातो. जे क्षेत्र जगातील सर्वात वृद्ध व्यक्तींचे ठिकाण मानले जाते. ब्ल्यू झोनवर अभ्यास करण्याची कल्पना डॉन ब्यूटनर यांची होती. हा अभ्यास त्यांनी नॅशनल जिओग्रॅफिकसोबत केला. डॉन ब्युटनर एक उद्योगपती होते, तर द हेल्दी हुंजासचे लेखक जोहन इर्विंग रोडेल ऑर्गेनिक गार्डिंग म्हणून ओळखले जात होते. दोन्ही लेखकांचा संबंध अमेरिकेशी आहे.

दिर्घ आयुष्याचे रहस्य
ब्ल्यू झोन्स डाएट आणि हुंजा लोकांच्या आहाराची ही माहिती समोर येते की हे लोक स्वता उगवलेले धान्य खातात. शहरी जीवनशैली त्यांना आवडत नाही. पर्यटक ही ठिकाणे पाहण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली जाणून घेण्यासाठी, त्यांचे पदार्थ चाखण्यासाठी जातात. या ठिकाणांवर राहणारे लोक प्लँट फूड वर विश्वास ठेवतात. विशेष करून गहू, बाजरी, जव, बीट, सी फूड आदी खातात. ब्ल्यू झोन्स पुस्तकात या लोकांमधील रेड वाईनच्या वापराबद्दल लिहिण्यात आले आहे. परंतु, हुंजा समुदायातील लोकांबाबत असा उल्लेख नाही. तसेच कमी खाणे हेदेखील दिर्घ आयुष्याचे रहस्य सांगितले गेले आहे. हे लोक दिवसात दोन वेळा जेवण करतात आणि तेही कमी खातात.

ब्ल्यू झोन्समधील ठिकाणे
1 कारिया (ग्रीस) : यूरोपियन स्टेट ग्रीसचे कारिया शहर ब्ल्यू झोन्समध्ये आहे. या ठिकाणी राहणारे लोक भरपूर प्रोटीन्सयुक्त मॅडिटेरेनियन आहार घेतात. यामध्ये ऑलिव्ह आईल, रेड वाईन आणि स्वता उगवलेली भाजी असते.

2 ओगलियास्त्रा, सार्डीनिया (इटली) : या ठिकाणी राहणार्‍या लोकांचे वय 100 पेक्षा कमी नसते. ओगलियास्त्रा एक डोंगर भागातील परिसर आहे. येथील लोक शेतात काम करतात आणि रेड वाईनचे जास्त सेवन करतात.

3 ओकिनावा(जपान) : ओकिनावा येथे राहणारे लोक सोया-बेस्ड फूड जास्त खातात. टाय चाय प्रॅक्टिस (एक प्रकारचा कराटेसारखा व्यायाम) आणि मेडिटेशन जास्त करतात.

4 निकोया प्रायद्वीप (कोस्टा रिका) : या ठिकाणी राहणारे लोक जेवणात बीन्स आणि कॉर्न टॉर्टिला(मक्याची चपाती) खातात. येथील लोक जास्त वयापर्यंत नोकरी करतात.

5 सेवंथ – डे अडवॅटिस्ट्स, कॅलिफोर्निया(यूएसए) : सेवंथ-डे अडवॅटिस्ट्स हा एक धार्मिक समुदाय आहे. हे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/