आता बकर्‍या आणणार महामारी ! संपर्कात येणार्‍या व्यक्तीला होतोय निमोनिया, आतापर्यंत गेले 95 जीव

नवी दिल्ली : जगभरातील देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. मात्र, अनेक देशांमध्ये व्हॅक्सीनेशनची सुरुवात झाली आहे, तरीसुद्धा लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले जात आहे. असे असतानाच नेदरलँडच्या दक्षिण भागात राहणार्‍या लोकांना निमोनियाची समस्या होऊ लागली आहे. देशाच्या या भागात बकर्‍यांचे फार्म आहेत आणि बकर्‍यांच्या संपर्कात येणार्‍या लोकांमध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे आता बकर्‍या सुद्धा महामारी आणणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

2008 मध्ये नेदरलँडच्या दक्षिण भागातील डेयरी फार्ममध्ये बकर्‍यांमध्ये गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती. यानंतर जनावरांच्या डॉक्टरांना बकर्‍यांचे नमूने पाठवण्यात आले. 10 पैकी 9 नमून्यांमध्ये कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. नेदरलँडच्या नूर्ड-ब्राबांट प्रांतात अखेर 2008 मध्ये श्वसन संसर्ग क्यू तापाच्या प्रकोपाचे निदान झाले. या आजाराने बकर्‍या, मेंढ्या आणि गुरांसह जनावरांना संक्रमित करण्यास सुरू केली.

50 हजार बकर्‍या मारण्याचे आदेश
आता हा आजार नेदरलँडच्या लोकांसाठी भयंकर रोग बनला आहे, कारण आता लोकांनाही तो होऊ लागला आहे. सरकारने संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सुमारे 50 हजार बकर्‍यांना मारण्याचे आदेश दिलेत. संक्रमित झालेल्या अर्ध्या लोकांना या आजाराने त्रस्त केले आहे. अनेक लोकांना हृदय विकाराचा झटका सुद्धा आला. या आजाराने आतापर्यंत 95 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बकरी फार्मच्या जवळ राहणार्‍यांना जास्त धोका
पुन्हा एकदा नेंदलँडच्या बकरी फार्ममध्ये प्राणीजन्य रोगाचे पुरावे मिळत आहेत आणि शास्त्रज्ञ आणि पशुतज्ज्ञांनी निमोनियाच्या मानवी प्रकरणांना बकर्‍यांच्या फार्मशी जोडले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बकरी फार्मच्या जवळ राहणार्‍या लोकांमध्ये 20 ते 55 टक्केपेक्षा जास्त लोकांना निमोनिया होण्याची शक्यता आहे. जे लोक फार्मच्या जवळ राहतात, त्यांना धोका जास्त आहे. एक ते दिड किमीच्या परिघात राहणार्‍या लोकांना निमोनियाचा धोका जास्त आहे.