सुंदर दिसण्यासाठी केला जुगाड मात्र सगळंच फिसकटलं, आता ट्रिटमेंटसाठी घालवले लाखों रूपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   जगातील प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. सुंदर दिसण्यासाठी त्या कधी काय करतील याचा नेम नाही. सौंदर्य वाढविण्यासाठी केलेल्या अशा विचित्र प्रयोगामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. अशाच एका मॉडेलची सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. तिचे गाल वेगळेच आहेत. जगातले सर्वात मोठे गाल असलेली महिला असे तिच्या नावावर रेकार्ड आहे. अनस्तास्या पोकरिकश्चुक असे या मॉडेलचे नाव आहे. यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर 2 लाख 20 हजार फॉलोअर्स आहेत.

युक्रेन येथे राहणारी 99 वर्षीय अनस्तास्या गेल्या काही वर्षापासून तिच्या गालावर पिलर्स टाकत आहे. तिने आपल्या ओठावर आणि गालावर फिलर्स टाकले आहेत. तिने शेअर केले आहे की तिला अजूनही मोठे गाल हवे आहेत. ही महिला वयाच्या 26 व्या वर्षी गालावर फिलर्स टाकले होते. त्यानंतर तिने अनेकदा असाच प्रयोग केला. ती म्हणते की, पहिल्यांदा गालावर फिलर्स टाकल्यावर ती फार आनंदी होती. त्यानंतर तिने फिलर्स टाकणे बंद केले. लोकांना वाटते की तिचा चेहरा विचित्र आहे. पण याने तिला काहीही फरक पडत नाही.