मुस्लिमांनो, काँग्रेसऐवजी महाआघाडीला मत द्या : मायावती

लखनौ : वृत्तसंस्था – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी निवडणूक प्रचारादरम्यान देवबंद येथे मुस्लिम समाजाला काँग्रेसऐवजी महाआडीला मत देण्याचे आवाहन केले. मुस्लिमांनी एकजूट होऊन सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीला मतदान करावे असे आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.

आज सहारनपूर, देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदची पहिली संयुक्त प्रचारसभा झाली. या सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. याच दरम्यान मी खास मुसलमान समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात, नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकू मतदान करू नका. एकगठ्ठा मतदान महाआघाडीला केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. धर्माच्या आणि जातीच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन हे अग्राह्य मानले जाते व आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते, त्यामुळे मायावती या अडचणीत आल्या असून निवडणूक आयोगाने याची दखल घेत अहवाल मागवला आहे.

देवबंद येथे केलेल्या भाषणात मायावती यांनी मुस्लिम समाजाने महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून अहवाल मागितला आहे. निवडणुकीत राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रचारादरम्यान कुठल्याही जाती, धर्म, भाषा आणि प्रादेशिक मुद्द्यावर भावनिक आवाहन करून मत मागू नये. यामुळे समाजात भेदभाव आणि तणाव निर्माण होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. पण मायावतींनी प्रचारसभेत मुस्लिम समाजाचा उल्लेख केल्याने त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.