‘या’ प्रोफेशनच्या लोकांची सेक्स लाईफ एकदम भारी, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय काम करता यावरून तुमची सेक्स लाईफ कशी आहे हे कळते. लंडनमध्ये पार पडलेल्या एका सर्व्हेतून अनेक रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. हा सर्व्हे लाईफ स्टाईल कंपनी ‘Lelo UK’ने केला आहे.

जवळपास 2000 महिला आणि पुरुषांमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेत खुलासा झाला आहे की, कोणत्या प्रोफेशनच्या लोकांची सेक्स लाईफ कशी असते. कोणते लोक आपल्या सेक्स लाईफला एन्जॉय करतात. या सर्व्हेतून असे समोर आले आहे की, सेक्स लाईफ एन्जॉय करण्यात शेतकरी सर्वात पुढे आहेत. 33 टक्के शेतकऱ्यांनी हे मान्य केलं की ते दिवसातून एकदा तरी सेक्स करतातच. या यादीत शेतकऱ्यांनंतर आर्किटेक आणि हेअर ड्रेसर्सचा नंबर येतो.

या सर्व्हेतील 21 टक्के आर्किटेक आणि 17 टक्के हेअर ड्रेसर्सने हे मान्य केलं की, ते प्रत्येक दिवशी एकदा तरी सेक्स करतात. इतकेच नाही तर 67 टक्के शेतकऱ्यांचा बेडवरील परफॉर्मंस चांगला मानला गेला. यात सहभागी वकिलांनी आपली सेक्स लईफ ठिक ठाक असल्याचं सांगितलं. 27 टक्के वकिलांनी सांगितलं की, ते सेक्स दरम्यान फेक ऑर्गेजम करतात. सेक्स लाईफ एन्जॉय करण्यात सर्वात पिछाडीवर पत्रकार होते. जास्तीत जास्त पत्रकारांनी सांगितलं की, ते महिन्यातून एकदाच सेक्स करतात.

‘Lelo UK’च्या एक्सपर्ट केट मोयले म्हणतात, “अनेक प्रोफेशनमध्ये आपापसात साम्य दिसतं. परंतु सेक्स आणि सेक्शुअलिटीला घेऊन लोकांचं मत वेगळं असतं. याशिवाय आपली सेक्स लाईफ कशी असते हे बहुतांशी आपल्या फिटनेस आणि एनर्जीवर अवलंबून असतं.”

पुढे मोयले यांनी म्हटलं, “आपली नोकरी कशी आहे, आपण किती तास काम करतो, आपल्या ऑफिसचं वातावरण कसं आहे या सगळ्याचा आपल्या सेक्स लाईफवरच नाही तर आपल्या जीवनावर परिणाम होतो.”

 

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like