‘माझ्या बिकिनी कडे लोक जरा जास्तच लक्ष देताहेत’ – रश्मी देसाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेत्री रश्मी देसाई गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. रश्मीने शेअर केलेल्या बिकिनीतील फोटोमुळे सोशल मीडियावर तिने धुमाकुळ घातला होता. मालिकांमध्ये साध्या भोळ्या रुपात दिसणाऱ्या रश्मीचा हा बोल्ड अवतार पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. रश्मी देसाईमध्ये मोठा बदल झाल्याचं म्हणत काही चाहते रश्मीच्या या नव्या लूकला पसंती देत आहेत तर काहींनी तिला ट्रोलही केलं. रश्मीने मात्र आपल्यात कोणताच बदल झाला नसल्याचं म्हंटलं आहे. रश्मी गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अनेक बोल़्ड फोटो शेअर करत आहे.

रश्मीने बिकिनीशूटमुळे तिच्या इमेजमध्ये झालेल्या बदलांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत रश्मी म्हणाली, ” मला वेगवेगळ्या स्टाइल करून बोल्ड फोटोशूट करण्याची कायमच आवड होती. आता फक्त लोक माझ्या लूककडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. ” पुढे ती म्हणाली, “मला याचा कायम आनंद होतो की प्रेक्षक मला माझ्या सगळ्या शोमध्ये मोठी पसंती देतात. मी याआधी देखील बोल्ड फोटोशूट केलं आहे. मला आठवतंय खूप पूर्वी मी एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. मला वाटलं हे माझं शरीर आहे आणि ते खूप सुंदर आहे. मी त्याकडे कसं पाहते ते महत्वाचं आहे. ” असं ती म्हणाली.

“तिला कोणत्याही प्रकारची प्रतिमा बदलण्याची आवश्यकता नाही. शिवाय आधी ती जे करत होती तेच आताही करत आहे”, असं तिने नमूद केलं. “माझी कोणतीही प्रतिमा बदलण्याची आवश्यकता मला कधीही वाटली नाही. मला वाटतं मी जबरदस्त कपडे घालते. खरं तर कपडे आणि दागिन्य़ाकडे मी कायम लक्ष देते. मात्र लोक कदाचित आता त्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. असं ती म्हणाली.