सतत पाय हलवण्याची इच्छा होते का ? असू शकतो ‘हा’ गंभीर आजार, ज्यानं वाढतो आत्महत्येचा धोका

पोलिसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला सतत पाय हलवण्याची इच्छा होत असेल तर वेळीच सावध व्हा कारण हे रेस्टलेस लेग सिंड्रोमचं लक्षण असू शकतं. हा एक असा आजार आहे ज्यात खास करून सायंकाळी किंवा रात्री पाय आकडणं, पायात वेदना होणं, पायात झिणझिण्या येणं असा त्रास होतो. अशात व्यक्तीला पाय हलवण्याची किंवा चालण्याची इच्छा होते. याशिवाय यानं अनेक समस्याही येतात. जसं की, झोप न येणं, बसताना त्रास होणं, उशीरापर्यंत एका जागेवर उभं राहता न येणं, याशिवाय आत्महत्येचा धोक वाढणं अशा गंभीर येऊ शकतात.

आत्महत्येचा धोका अधिक

प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, ज्यांना हा आजार असतो त्यांचा स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा किंवा आत्महत्या करण्याचता धोका जास्त वाढतो. ही स्थिती रुग्णाला डिप्रेशन, स्ट्रेस, डायबिटीज किंवा झोप न येणं अशा समस्या निर्माण करू शकते.

कसा केला रिसर्च ?

अमेरिकेत करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोमनं पीडित 24179 रुग्ण आणि 1,45,194 लोक असे होते ज्यांना हा सिंड्रोम नव्हता. यातील कोणालाच आत्महत्या किंवा स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचे विचार येत नव्हते. परंतु ज्यांना तो सिंड्रोम होता त्यांची मात्र स्वत:ला नुकसान पोहोचवण्याची किंवा आत्महत्येची शक्यता 270 टक्क्यांनी अधिक होती. डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर अशा आजारांचे फॅक्टर्स दूर करूनही ही शक्यता कमी झाली नाही.

रेस्टलेस लेग सिंड्रोम आणि आत्महत्या यांच्या कनेक्शनचं कारण अद्याप संशोधकांनाही कळालेलं नाही. या संदर्भात आणखी रिसर्चची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.