बोगस सिमच्या आधारे आमदार राहुल दादांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्यांना अटक

दौंड :पोलीसनामा ऑनलाईन 

अब्बास शेख

मोबाईल शॉपीमध्ये नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीय ग्राहकाची सिमकार्डसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन त्या आधारे परस्पर सिम चालू करून आमदार राहुल दादांच्या जीवाला धोका असल्याचा अफवेचा मेसेज टाईप करून तो मेसेज थेट पोलीस अधीक्षकांना पाठवून अफवा पसरवणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (Lcb) पथकाला यश आले आहे.

या बाबत स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे पोलीस नाईक महेश वसंत गायकवाड यांनी फिर्याद दिली असून यवत पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’937ce211-c584-11e8-b7c3-cd690af4970b’]
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अटक केलेले आरोपी सागर विनायक भानवसे वय २९ रा. कौठीचा मळा वरवंड ता दौंड याने आरोपी आकाश राजेंद्र होले रा.गारफाटा पाटस, ता दौंड याच्याकडून त्याच्या पाटस येथील मोबाईल शॉपीमधून रबीउल सईद रा.पश्चिम बंगाल सध्या कानगाव ता. दौंड या ग्राहकाची सिमसाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन त्यावर परस्पर सिम नंबर ९१४५०३८२१५ हा चालू करून त्यावर “राहुल दादांना संपवनार आहेत” व अजूनही काही मजकूर टाईप करून तो थेट पोलीस अधीक्षकांना पाठवला होता याबाबत स्थानिक गुन्हे शाखा (Lcb) चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सहा.पोलीस निरीक्षक जी.ए क्षीरसागर, जी.वाय गायकवाड, पोलीस नाईक महेश वसंत गायकवाड, राऊत, कांचन, जाधव यांच्या पथकाने सखोल चौकशी केली असता वरील आरोपी सागर भानवसे याने मोबाईल शॉपी चालक आकाश होले याच्याशी मिळून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार केल्याचे उजेडात आणून वरील दोन्ही आरोपींना जेरबंद करून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

 

[amazon_link asins=’B019XSHB7O,B074RMN99F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9b9f03c-c584-11e8-8818-6b298291467e’]