लोकांना मोदींमध्ये पहायचेत वाजपेयी : मुफ्ती

श्रीनगर : वृत्तसंस्था

काश्मीरमधील लोकांची निराशा झाली आहे कारण त्यांना नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पहायचे होते. पण ते कधीच झाले नाही. त्यांना आमच्याकडूनही अपेक्षा होत्या. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरला सोबत घेऊन जाण्याबद्दल सांगितले होते. पण ते खरेच तसे करत आहेत का? असा प्रश्न जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विचारला आहे.

[amazon_link asins=’B01BKEZYBY,B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a750b90e-a82d-11e8-8340-8b078a643d41′]

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेहबूबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, काश्मीरमधील रक्तपात थांबवायचा असेल तर वाजपेयींनी दाखवलेला मार्ग अवलंबला पाहिजे. पुन्हा एकदा काश्मीरमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी वाजपेयींनी २००३ मध्ये काश्मिरीयत, जम्हूरीयत आणि इन्सानियत ही त्रिसूत्री निर्धारित केली होती. कारगिल युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतरही वाजपेयी यांनी चर्चेची दारे बंद केली नव्हती.

काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पहायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखवलेल्या चर्चेच्या तयारीचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, वाजपेयींनी राजकीय प्रक्रियेला सुरुवात केली होती. आपण त्यांचे वारसदार आहोत. आपण कोणताही नवा मार्ग शोधण्याची गरज नाही. काश्मीरी जनतेसोबत चर्चा करण्याचा विषय असो अथवा पाकिस्तानसोबत सलोखा राहण्याचा ना युपीएने त्यासाठी प्रयत्न केले ना एनडीए करताना दिसत आहे. दुर्देवाने दहशतवाद्यांनी याचा फायदा घेतला असून हिंसाचार वाढत चालला आहे.