भाजप-शिवसेना युती तुटल्याने भाजपत आलेल्या ‘आयारामां’ची कारकिर्द ‘पणाला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने मेगा भरती करत अनेकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. राज्यात स्वबळावर सत्ता स्थापनेच्या उद्देशाने भाजपने वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. मात्र, निकालानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपला पुरेसे ठरले नाही. जे नेते मंत्रीपदाच्या किंवा विधान परिषदेच्या आश्वासनांवर भाजपमध्ये दाखल झाले, त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे.

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्याचा ओपिनियन पोल आल्यानंतर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तब्बल 30 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये विद्यमान आमदारांचाही समावेश होता. राष्ट्रवादीच्या या सर्व नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राज्यात वर्चस्व निर्माण केले. मात्र, निकालानंतर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याने भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ देणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी आशा होती. मात्र, सध्या राज्यात भाजप शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये विधान परिषदेच्या 20 जागा रिक्त होणार आहेत. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले असते तर भाजपला 13 जागा मिळाल्या असत्या. मात्र आता राज्यातील राजकीय समिकरणे बदल्याने विधान परिषदेच्या आशेवर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले. युती झाल्यानंतर भाजपला मिळणाऱ्या 13 जागांचा लाभ आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना होणार आहे. त्यामुळे या पक्षातील इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून इच्छूकांना विधान परिषदेवर निवडून येण्याची खात्री झाली आहे.

Visit : Policenama.com