सावधान ! मोबाइलवर ‘एवढया’ तासांपेक्षा अधिक वेळ घालवल्यास ४३% वाढतं ‘वजन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला तुमच्या वजनापासून सुटका करायची आहे का ? तर त्यासाठी तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या महत्वाच्या गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे. कॅलिफोर्नियाच्या सिमोन बोलिवर विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाईलचा सतत ५ तास वापर केल्याने वजन वाढण्याची भीती असते. जवळपास ४३ टक्के वजन वाढण्याची भीती यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. मोबाईलवर सतत बसल्याने आणि काहीही हालचाल न केल्याने तुम्हे वजन वाढून स्थूलपणा येण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर अति प्रमाणात खाण्यामुळे देखील तुमचे वजन वाढण्याचा धोका असतो.

दिनचर्या बिघडल्याने वाढतो निद्रानाश
या रिसर्चमध्ये १००० विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. जून ते डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये समोर आले कि, फोनचा अति वापर करणारे विद्यार्थी गोड पदार्थ, फास्ट फूड आणि जंक फूडचे अति प्रमाणात सेवन करतात. त्याचबरोबर व्यायाम देखील करत नाहीत. त्यामुळे त्यांची दिनचर्या आणि शरीरातील पचनक्रिया बिघडल्याने झोप येत नाही आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. हृदय रोग विशेषज्ञ प्रो. मिरेरी मेंटीला-मोरोन यांच्यामते रुग्णाच्या हातातील मोबाईल हाच त्याचे वजन वाढण्याचे फार मोठे कारण आहे. सलग वजन वाढल्याने तुम्हाला हृदयरोगांसारखे आजार देखील बळावण्याची दाट शक्यता असते. या रिसोर्समध्ये सहभागी झालेल्या मुलांमधील २५ टक्के मुलांचे वजन हे क्षमतेपेक्षा जास्त होते. म्हणजेच ते स्थूल होते.

दरम्यान, टेक्सासच्या राइस विद्यापीठाच्या मते मोबाईल वापरताना लोकांना फास्ट फूड दिल्यास त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटते. त्याचबरोबर यापूर्वी देखील अनेक रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like