दहा-पंधरा वर्षांनंतर सिंगापूर-कॅलिफोर्नियाबरोबर अमेठीचेही नाव घेतले जाईल : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधण्याच्या मागे लागले आहेत. ते सध्या आपल्या लोकसभा मतदारसंघ अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. अमेठीत एका एका कार्यक्रमात त्यांनी अमेठीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर इथला विकास हा जागतिक दर्जाचा विकास असेल, याचे वर्णन करताना ते म्हणाले, दहा-पंधरा वर्षांनंतर लोक सिंगापूर-कॅलिफोर्निया या शहरांबरोबरच अमेठीचेही नाव घेतील.

यावेळी राहुल गांधींनी मोदीसरकारवर देखील कडाडून टीका करताना म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उभे रहायला घाबरतात. संसदेत जर मला भाषणासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला तर पंतप्रधान बोलण्यासाठी उभेही राहू शकणार नाहीत. राफेल किंवा नीरव मोदीचे प्रकरण असू देत मोदींना बोलताच येणार नाही.”
राहुल गांधींवर नुकताच विरोधकांनी अमेठीचा विकास न केल्याचा आरोप केला होता. या आरोपाला मंगळवारी त्यांनी अमेठीत उत्तर दिले.