पराभवातूनही बोध न घेणाऱ्या राणे पिता-पुत्रांना जनता जागा दाखवेल

मंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप – शिवसेना युतीबाबत खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ” अनेक निवडणुकांमध्ये पराभव पदरी पडल्यानंतरही ,नारायण राणे आणि त्यांचा मुलगा त्यातून बोध घेत नाहीत.आजही ते पूर्वीसारखंच बोलत आहेत त्यामुळे यावेळीही जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा टोला लगावला आहे. त्यामुळे आता त्यांच्यातील शाब्दिक वाद पान्हा उफाळून येणार आहे असे वाटते आहे.
 शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कटच होता, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे फक्त भासवण्यात आले होते असा आरोप निलेश राणी यांनी केला होता. मात्र आता नारायण राणे यांनी या दाव्याचे खंडन केले.आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात जे काही आरोप मध्यंतरी झाले ते मला मान्य नाही असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.
युतीनंतर मात्र काहीच महिन्यांपासून भाजपसोबत असलेल्या नारायण राणे यांची चांगलीचं पंचाईत झाली आहे. अर्थात, शिवसेनेविरोधात काही मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवण्याच्या हालचाली राणेंनी सुरू केल्याचं कळते आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देणार असल्याचं दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.