‘या’ राशीच्या लोकांना ‘सोशल मिडिया’चे सर्वाधिक ‘व्यसन’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सोशल मिडियावर आज लोक मोठ्या प्रमाणात वेळ घालवतात. आता तर अशी परिस्थिती आहे की, सोशल मिडिया एकदा चेक करुन भागत नाही तर सकाळी उठल्या उठल्या सोशल मिडियाचा वापर सुरु होतो. सोशल मिडियाचे तसे अनेक फायदे आहेत. परंतू त्याचे काही प्रमाणात नुकसान देखील आहे. काही लोकांना तर सोशल मिडियाचे एवढे व्यसन असते की ते 5 मिनिट देखील सोशल मिडियापासून लांब राहू शकत नाहीत. परंतू तुम्हाला माहित आहे का की काही अशा राशीचे लोक आहेत ज्यांना सोशल मिडियाचे मोठे व्यसन आहे. त्यामागे त्याच्या राशीचे कारण आहे.

सोशल मिडियाचा या राशींकडून होतो जास्त वापर –
मिथुन रास –
वास्तवात मिथुन राशीचे लोक जास्त सामाजिक असतात आणि त्यांना सकाळी उठल्यापासून सोशल मिडिया अकाऊंट चेक करण्याची सवय असते. ते सोशल मिडियावर आपले मत मांडण्यास आणि विविध विषयांवर बोलणे पसंत करतात.

वृश्चिक रास –
या राशीचे लोक मनकवडे असतात. त्यांना हे जाणून घ्यायचे असते की एखाद्याच्या जीवनात काय चालू आहे, परंतू आपल्या खासगी जीवनाची बाब येते तेव्हा ते काहीही बोलत नाहीत. त्यांचा सोशल मिडियावर तुम्हाला त्यांच्या संबंधित जास्त माहिती मिळणार नाही. परंतू ते तुमच्या बाबत मात्र सर्व जाणून असतात.

सिंह रास –
सिंह राशीचे लोक सोशल मिडियावर आपली सेल्फी, स्पेशल डे, शॉपिंग, आउटिंग असे विविध फोटो शेअर करतात. या राशीच्या लोकांचे फॉलोवर्स देखील जास्त असतात.

तुळ रास –
या राशीचे लोक सोशल मिडियात आपला वेळ दुसऱ्यांना पाहण्यात घालवतात. ते सर्व सोशल मिडिया अकाऊंटवर आणि अ‍ॅप्सवर कायम सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या एक्सच्या जीवनावर नजर ठेवण्याची सवय असते.

धनु रास –
धनू राशीचे लोक आकस्मिक सोशल मिडिया वापरणारे असतात. ते आपले सर्व पोस्ट विचारपूर्वक टाकतात. ते शेअरिंग भरपूर करतात. सतत वापर केल्यानंतर त्यांना सोशल मिडियाची जास्त सवय लागते.

You might also like