संस्कारी सुनेमुळं केडगावकर भारावले

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे आज बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी चंद्रकांत जयसिंग कदम यांच्या कदम हॉस्पिटल आणि मेडिकल चा उदघाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते दौंड तालुक्याच्या संस्कारी सुनबाई आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी.

बुधवारी सकाळी ११ वाजता कदम हॉस्पिटल आणि मेडिकलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. ठरल्या वेळे प्रमाणे सर्व ग्रामस्थ, दौंडच्या माजी आमदार रंजनाताई कुल, माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांसह बारामती लोकसभा मतदार संघामध्ये भाजपकडून उभ्या राहिलेल्या कांचनताई कुल या कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. उदघाटन झाल्यानंतर विविध मान्यवरांची भाषणे होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कुल गटातील काही कार्यकर्ते कांचन कुल यांची काही मान्यवर आणि जेष्ठ मंडळींशी ओळख करून देऊ लागले त्यावेळी वयस्क मंडळींना पाहून कांचन कुल या नुसता नमस्कार न करता त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेत होत्या आणि तितक्याच आदराने त्यांच्याशी वार्तालाप करत होत्या.  हे पाहून उपस्थितांना मात्र आश्चर्याचा धक्का बसत होता. कारण तब्बल पंचवीस वर्षांपासून कुल कुटुंब विधानसभेच्या माध्यमातून तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना आजही या कुटुंबामध्ये सर्वसामान्य जनता आणि जेष्ठ नागरिकांप्रति इतके प्रेम आणि आदर असेल असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल.

घटना किरकोळ असली तरी कुल कुटुंबाची नाळ येथील जनतेशी कशा पद्धतीने जोडली गेली आहे याचे उत्तम उदाहरणच येथील ग्रामस्थांनी आज आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि आपल्या दौंडची सून नुसती उच्चशिक्षितच नसून संस्कारी ही आहे याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये सुरू झाली.

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like