भद्रावती शहरातील जनता कर्फ्यू बेकायदेशीर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपुर जिल्हातील भद्रावती शहरात 16 सप्टेंबर पासुन पाळण्यात येणारा जनता कर्फ्यू हा स्वयंघोषीत, अवैध व बेकायदेशीर असुन जनता कर्फ्यू पुकारणाऱ्यावर, या कर्फ्यू चा नावावर जोर जबरदस्तीने लहान व्यापारी व सामान्य व्यावसायिकांना त्यांची दुकाने बंद करायला लावणार्यावर तसेच सदर कर्फ्यू ला प्रोत्साहन देणार्या शासकीय अधिकारी व कर्मचार्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे एका निवेदनाद्वारे भद्रावती चे तहसीलदार महेश शितोळे यांच्या कडे आज दि. 16 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यापासून देशात सर्वञ हाहाकार पसरविणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार तत्परतेने काम करित आहे. या करिता आवश्यक तेव्हा लाॅकडाऊन सुध्दा घोषित केले गेले आहे. प्रशासन सुध्दा तत्परतेने या वायरसच्या विरोधात काम करतांना दिसुन येते. एवढेच नव्हे तर शासन आणि प्रशासनाच्या या प्रयत्नात सर्व सामान्य जनतेने सुध्दा तेवढ्याच तत्परतेने सहभाग दिलेला आहे व देत आहे. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाचा काळात सामान्य माणसाचा मोठ्या प्रमाणात रोजगार बुडून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. विशेषत: हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यवसायीक व मोल मजुरांचे मोठे आर्थिक हाल होतांना दिसुन आले आहे. त्यामुळे भारत सरकारने सुध्दा आता लाॅकडाऊन करण्यावर बंदी घातली असुन जन सामान्यांना वयक्तीक सुरक्षा उपाययोजना करून आपआपले रोजगार सुरू करण्यास शासनाने प्रोत्साहन दिलेले आहे. असे असतांना भद्रावती शहरात काही मंडळींनी अती उत्साहीपणा दाखवत त्यांच्या तथाकथित संघटनांच्या नावाने दि. 16 सप्टेंबर पासुन जनता कर्फ्यू घोषित केला आहे. तसेच या कर्फ्यू ला शासकीय अधिकारी व कर्मचार्यांची मदत सुध्दा मागितली आहे. शहरातील मेडिकल असोसिएशनला त्यांच्या मेडिकल स्टोअर्स च्या वेळा बदलायला सुचित केले आहे. असाही आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे.

वरील सर्व कृत्य अवैध व बेकायदेशीर आहे. असे कृत्य करणाऱ्यावर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव गोर गरीबांच्या न्याय हक्कांन साठी पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष ॲड भूपेंद्र रायपुरे, वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष अजयभैया लिहितकर, भद्रावती शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, उपाध्यक्ष मितवा पाटिल, शहर सचिव प्रफुल गोलिवार, वैभव मानकर, सचिन राहुलगडे, विशाल कांबळे, प्रशांत गोलाईत, नरेश नागपुरे, वैभव पाटिल उपस्थित होते.

व्यापार्यांनी स्वेच्छेने पुकारलेला जनता कर्फ्यू आहे – अनिल धानोरकर नगराध्यक्ष नगर पालिका भद्रावती
दि. 16 सप्टेंबर पासुन भद्रावती शहरतात सुरू झालेला जनता कर्फ्यू हा व्यापार्यांनी स्वेच्छेने पाळलेला आहे. त्यामुळे या कर्फ्यू ला परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळात कोणिही व्यापारी स्वतःची दुकाने स्वताहुन बंद ठेवु शकतात. जनता कर्फ्यू पाळु शकतात. ज्यांना आपली दुकाने बंद ठेवायची नाहीत, ते व्यापारी दुकाने चालु ठेवु शकतात. माञ त्यांना कोरोणाचा नियमाचे पालन करावे लागेल अन्यथा नगर पालिका तर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणावर जबरदस्ती करण्याच्या प्रश्नच नाही. अशी प्रतिक्रिया भद्रावती चे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिली

आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही – प्रकाश पाम्पट्टिवार – समस्त व्यापारी संघटना
भद्रावतीत जनता कर्फ्यू पाळतांना आम्ही कोणाच्या दबावाखाली येवुन जनता कर्फ्यू पाळला नाही. तसेच कोणत्याही लहान व्यापार्यांला किंवा सामान्य व्यावसायिकाला जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केलेली नाही. भद्रावती शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दवाखान्यात रूग्णांना ठेवायला जागा नाही. कोरोनाच्या नावाखाली आम जनतेची पिळवणूक होत आहे. त्यामुळे आमचेही काही उत्तरदायित्व आहे.असे समजुन व्यापारी संघटनेने या जनता कर्फ्यूचे आवाहन केले. मात्र कोणावरही जोर जबरदस्ती केली नाही. त्यामुळे ज्यांची ईच्छा असेल ते बंद ठेवू शकतात व ज्यांची ईच्छा नसेल ते चालु ठेवू शकतात. अशी प्रतिक्रिया समस्त व्यापारी संघटना भद्रावती चे अध्यक्ष प्रकाश पाम्पट्टिवार यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like