बकोरीतील ‘त्या’ कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

वाघोली : बकोरी (ता: हवेली) येथील एका कंपनीतील कामगाराला कोरोना लागण झाल्याचा अहवाल नुकताच आला आहे त्यामुळे बकोरी गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे कोरोना बाधित व्यक्ती हा बकोरी मधील एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये कामाला होता. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात गावातील अनेक व्यक्ती तसेच कंपनीतील काही लोक आल्याचा अंदाज आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणे यांच्याकडून बकोरी ग्रामपंचायतला पत्र देउन कंपनी 14 दिवस बंद ठेवण्याबाबत विचार करण्यात यावा. अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे.तर बकोरी ग्रामपंचायतने देखील कंपनी बंद ठेवण्या बाबत पत्र कंपनीला दिले आहे.

या बाबतीत माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले की कंपनी व्यवस्थापनाबाबत महसुल प्रशासनाकडे गेले तिन महिन्यापासून अनेक तक्रारी केल्या त्यामध्ये स्थानिक कामगारांनाच कामावर घेण्यासाठी आग्रह केला परंतु कंपनी प्रत्येक वेळेला शासनाचे वेगवेगळे जी.आर. दाखवून संबंधित विषयाला केराची टोपली दाखवली. कंपनी चालली पाहीजे परंतु गावाला कोणत्याही प्रकारचा धोका न होता प्रशासकीय निमाचे तंतोतंत पालन करावे.मात्र तेवढी काळजी घेत नसल्याने निदर्शनास आल्याने कंपनीतील कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे त्यामुळे गावातील काही कामगार व गावातील नागरिकांना धोका निर्माण झाला असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा2005 ,मुंबई पोलिस अधिनियमन 1951, व भारतीय साथ रोगनियत्रन अधिनियमन 1897 फौजदारी गुन्हा दाखल करावी अशी मागणी माहिती सेवा समितीच्या वतीने लेखी पञाद्वारे जिल्हाधिकांराना केली आहे.

प्रतिक्रिया:-
आम्ही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कंपनी चालवत आहे. जो रुग्ण आढळलाय तो चार दिवसापासून गैरहजर होता.त्यामुळे त्याला बाहेरच कोरोनाची लागण झाली .कंपनीतीला त्यांच्या संपर्कातील 7 ते 8 कामगारां देखील काॕरटाइन केले आहे.

योगेश सातव( कंपनी.एच आर. मॕनेजर )