किर्तीचक्र मेजर प्रदीप ताथवडे यांच्या स्मारकाची दुरवस्था, पुतळा उभारण्याची मागणी

शिक्रापूर – शिरुर तालुक्याच्या केंदूर गावचे सुपुत्र मेजर प्रदीप ताथवडे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अतिरेक्यांशी दोन हात करत असताना यांनी पुँछ सीमेवर तीन अतिरेक्यांना ठार केल्यानंतर अतिरेक्यांच्या झालेल्या झटापटीत मेजर प्रदीप ताथवडे हे जखमी झाले आणि त्यांना वीरगती मिळाली त्यांनतर त्यांचे त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यात आले. माञ आता त्याची दुरवस्था झालेली असून त्याठिकाणी ताथवडे यांचा पुतळा उभारण्याची मागणी माजी सैनिकांनी केली आहे.

केंदूर ता. शिरूर गावचे सुपुत्र मेजर प्रदीप ताथवडे हे भारताच्या पुँछ सीमेवर देशाचे रक्षण करत असताना त्यांनी स्वतः अतिरेक्याविरुद्धची मोहीम हाती घेतली आणि स्वतः तीन अतिरेक्यांचा खात्मा करत तिघांना ठार तर केलेच पण त्यावेळी त्यांच्या तुकडीने पाचही अतिरेक्यांचा खात्मा केला होता, यावेळी अतिरेक्यांच्या झालेल्या झटापटीत मेजर मेजर प्रदीप ताथवडे यांना १७ जून २००० रोजी वीरगती प्राप्त झाली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रम आणि देशरक्षणाच्या कर्तव्याप्रती केलेल्या त्यागाबद्दल भारत सरकारच्या वतीने त्यांना मरणोत्तर किर्तीचक्र शौर्यपुरस्काराने गौरविण्यात आले, त्यांनतर पुण्यामध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात आलेले मात्र त्यांच्या मूळ गावी देखील स्मारक उभारण्याची मागणी केंदूर ग्रामस्थ आणि मेजर ताथवडे यांच्या कुटुंबीयांनी केलेली असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून केंदूर गावातील शासकीय जागा ताथवडे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली असून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेले असून त्या स्मारकात अद्याप पर्यंत मेजर ताथवडे यांचा पुतळा उभारण्यात आलेला नसून सदर स्मारकात अस्वच्छता झालेली असल्याने त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र तसेच भारतीय माजी सैनिक संघ शिरूर च्या वतीने सदर स्मारकाची स्वच्छता करत येथे शहीद जवान प्रदीप ताथवडे यांचा पुतळा बसविण्याची मागणी माजी सैनिकांनी केली आहे, यावेळी त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्रचे संस्थापक धनसिंग शितोळे, अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, पच्छिम महाराष्ट्र सचिव तुकाराम डफळ, भारतीय माजी सैनिक संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष संभाजी धुमाळ, मेजर प्रदीप ताथवडे यांचे चुलते पांडुरंग ताथवडे, भाऊ मिलिंद ताथवडे तसेच माजी सैनिक सुरेश उमाप, जालिंदर ढमढेरे, आनंदराव ढमढेरे, चंद्रकांत लांडगे, सुरेश ढमढेरे, बबन गायकवाड, परशुराम शिंदे, भाऊसाहेब जाधव, नंदकुमार रोडे, तुकाराम रासकर, सैनिक पत्नी सुवर्णा लांडगे, अनिता नेऱ्हे, मालन जाधव, कल्पना बगाटे, कुमोदिनी बोऱ्हाडे यांसह आदी माजी सैनिक व महिला उपस्थित होत्या, यावेळी अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत भारत माता कि जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय जवान जय किसान, मेजर प्रदीप ताथवडे अमर रहे या घोषणा दिल्या असून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच येथे पुतळा बसविणार असल्याचे माजी सैनिकांनी सांगितले. तर यावेळी बोलताना माझा लहान भाऊ शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांचा संपूर्ण केंदूर गावाला अभिमान असून त्यांना शरणागती मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने त्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न केले असून प्रत्येक वर्षी येथे झेंडावंदन केले जात असून या ठिकाणी पुतळा बसविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो परंतु आता माजी सैनिकांनी यामध्ये लक्ष घातले असून लवकरच येथे पुतळा उभारला जाईल आणि शहीद ताथवडे यांचे योगदान युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि केंदूर गावचे नाव भारतात फिरेल असे मत मेजर प्रदीप ताथवडे यांचे भाऊ मिलिंद ताथवडे यांनी व्यक्त केले.