‘आप’च्या कामगिरीवर दिल्लीकर खूष : CM केजरीवाल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच जोर धरू लागला आहे. साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्लीत आठ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानाचे प्रमाण वाढावे आणि ‘झाडू’ हे आपले निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या चिन्हावर आधारीत एक पकड घेणारं गाणं तयार करण्यात आलं असून ते सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आलं आहे. मला आवडलेलं एक चांगलं प्रचार गीत असे म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या गाण्याची प्रशंसा केली आहे.

आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसाठी जनकपुरी, तिलकनगर आणि मादीपूर विधानसभा मतदारसंघात केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर सारे दिल्लीकर बेहद्द खूष आहेत असे केजरीवाल यांनी रोड शो नंतर बोलताना सांगितले. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात आमच्या सरकारने केलेल्या कामगिरीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही केजरीवाल यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like