रेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा म्हणाली- ‘लोक त्यांच्या मुलांना माझ्याापासून लांब राहायला सांगत’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस रेणुका शहाणे (Renuka Shahane) जेव्हा 8 वर्षांची होती तेव्हा तिचे आईवडिल वेगळे झाले होते. रेणुकाला आजही त्याचं दु:ख आहे. रेणुकानं नुकतंच यावर भाष्य केलं आहे. पालकांच्या घटस्फोटोचा लहान मुलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतो. मी सुद्धा हे भोगलं आहे असं म्हणत रेणुकानं तिचं दु:ख मांडलं आहे.

 

 

 

 

 

 

नेटफ्लिक्सच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये बोलताना रेणुकानं याबाबत खुलासे केले आहेत. ती म्हणाली की, मी 8 वर्षांची होते जेव्हा माझे आईवडिल वेगळे झाले. त्या लहान वयात मी खूप काही भोगलं.

 

 

 

 

 

पुढं बोलताना रेणकुा म्हणाली, अनेक लोक त्यांच्या मुलांना माझ्यासोबत खेळण्यापासून रोखत असत. कारण माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. तिच्या सोबत खेळू नका. ती तुटलेल्या कुटुंबातून आली आहे असं ते आपल्या मुलांना सांगत. माझ्या सोबत त्यांची मुलं खेळली तर त्यांचे कुटुंबही तुटेल असं त्यांना वाटत होतं.

 

 

 

 

 

 

रेणुकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. ती एक चांगली डायरेक्टर देखील आहे. तिनं रिटा हा मराठी सिनेमा डायरेक्ट केला आहे. अलीकडेच तिनंच डायरेक्ट केलेला काजोल स्टारर त्रिभंगा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. यात काजोलनं एका ओडिशी डान्सरची भूमिका साकारली आहे. रेणुकाचा हम आपके है कौन हा सिनेमा खूप हिट झाला आहे. तिच्या अभिनयानं साऱ्यांचंच मन जिंकलं होतं. आजही तो सिनेमा चाहते आवडीनं पाहतात. यात तिची आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री खूप गाजली. या सिनेमानंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही खूप गाजल्या.