दुष्काळग्रस्तांच्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाच्या नाकीनऊ

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यात नागरिकांनी केलेल्या शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशासनाला अनभिज्ञ ठेवत नागरिकांनी वडुजयेथील १०० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढून सुमारे सात ते आठ तास ठिय्या आंदोलन केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ffdd916-d381-11e8-9650-41678784890f’]

सध्या सातारा जिल्ह्यातील काही भागात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. असे असताना या भागाला डावलत राज्यकर्त्यांनी जिल्ह्यातील पाणीदार तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश केला. मात्र, कायम दुष्काळी असलेल्या खटाव तालुक्याला या यादीतून वगळले. या प्रकारामुळे खटावमधील नागरिक संतप्त झाले आहेत. आपल्या संतप्त भावना प्रशासनापर्यंत आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, नगरसेवक शहाजी गोडसे, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, अनेक सरपंच, पृथ्वीराज गोडसे, राजेंद्र माने, लाला गोडसे, धनाजी लवळे, बाळासाहेब पोळ, नाना पुजारी, राहुल सजगणे, अतुल पवार आदींनी वडूजमध्ये नव्याने बांधलेल्या १०० फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन केले. खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे, प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा हे आंदोलनकर्ते देत होते.

मदत करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच गुंडाची शिवीगाळ आणि धक्काबुक्की

काही वेळानंतर नायब तहसीलदार सुधाकर धाइंजे आले. त्यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना खाली येण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी येईपर्यंत आम्ही खाली येणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी टाकीवर जाऊन कार्यकत्र्यांची समजूत काढली. मात्र कार्यकर्ते मागणीवर ठाम राहिल्याने प्रांतांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावेळी विजय शिंदे यांनी आमच्या तालुक्यावर अन्याय होतो आहे, तुम्ही या, अशी विनंती केली. आमची मागणी मान्य करून न्याय द्यावा, अन्यथा आम्ही तालुक्यातील ३ लाख नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला. कार्यकर्ते मागे न हटल्याने प्रांताधिकारी निघून गेले. त्यानंतर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख टाकीवर आले. त्यांनी देखील जिल्हाधिकारी यांचेशी फोनवर बोलून कार्यकर्त्यांच्या रास्त भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रतिनिधी भेट देतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर उशीरा जिल्हाधिकारी तेथे दाखल झाले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd98a729-d381-11e8-8c47-e97197e320a2′]