home page top 1

नगरच्या जागेसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा दावा, अन्यथा…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून राजकारणात सक्रीय असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीने गेल्या 20 वर्षापासून मित्रपक्षांशी प्रमाणिक राहून कार्य करत आहे. येत्या विधानसभेत प्रा.जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या आदेशानुसार ही उमेदवारी मागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर उमेदवारी न दिल्यास मित्र पक्षांशी बंडखोरी करुन संभाव्य उमेदवार अपक्ष उभा करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनिल क्षेत्रे यांनी दिला.

अहमदनगर शहर- सुनील क्षेत्रे, किरण गायकवाड, श्रीरामपूर (राखीव)- सुमेध गायकवाड, संतोष मोकळ, कर्जत-जामखेड- लक्ष्मण साळवे गुरुजी, महेंद्र साळवे, प्रमोद भैलुमे, नेवासा- अ‍ॅड.बाबासाहेब ब्राह्मणे, मधुकर पावसे, कोपरगाव- मा.जि.प. सदस्य संपतराव भारुड हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संभाव्य उमेदवार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने मित्र पक्षासाठी जागा सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठांशी चर्चा करुन स्थानिक पदाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला असल्याचे क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, किरण गायकवाड, नईम शेख, अन्सार शेख, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

Visit – policenama.com 

 

 

Loading...
You might also like