इंदापूर तालुक्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात वाढला टक्का ! कुणाला बसणार धक्का

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पदविधर व शिक्षक मतदार संघ निवडणुक 2020, मतदान प्रक्रीया मंगळवार दिनांक एक डिसेंबर रोजी सर्वत्र पार पडली असुन या मतदार संघातील इंदापूर तालुक्यात पदविधर व शिक्षक मतदारांनी उत्सुपुर्त सहभाग घेवुन मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने इंदापूर तालुक्यात पदविधर मतदार संघात एकुण 57.60 टक्के मतदान झाले आहे.तर शिक्षक मतदार संघात तालुक्यात एकुण 83.66 टक्के मतदान झाले आहे.तर इंदापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संखेने पदविधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदान प्रक्रीया संपल्यानंतर मतदारांनी आनेक ठीकाणी फटाके वाजवुन आनंद व्यक्त केला.

पदविधर व शिक्षक मतदार संघातील 62 उमेदवारांसाठीच्या नावडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातील पांच गावामध्ये एकुण 16 मतदान केंद्राची निर्मीती करून त्याठीकाणी मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. यामध्ये इंदापूर येथे 6 ,भिगवण 1, बावडा 4, सणसर 2,व निमगाव केतकी येथे 3 बुथची निर्मीती निवडणुक प्रशासनाकडुन करण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतदारांमधील उत्साह शिगेला पोहचला असुन वाढलेल्या टक्यामुळे कुणाला धक्का बसनार.? या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे. तर राजकीय पक्षाच्या पदाधीकार्‍यांनी आपआपली जबाबदारी पार पाडली असुन मतदार निर्णय कुणाच्या बाजुने देणार याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे.

इंदापूर तालुक्यात आगामी काळात 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आल्या असुन त्याचीच पुर्व तयारी म्हणुन पूणे पदविधर व शिक्षक निवडणुकीकडे पाहीले जात आहे. या नावडणुकीत तालुक्यातील स्थानिक गावपातळीवरील गाव पुढार्‍यांचा कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यात पदविधरांचे एकुण मतदाण हे 10 हजार 857 इतके असुन त्यापैकी 6 हजार, 254 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असुन तालुक्यात 57.60 इतकी टक्केवारी आहे. तर शिक्षक मतदारांचे तालुक्यात एकुण 1224 मतदान असुन त्यापैकी 1024 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने शिक्षक मतदानाची 83.66 इतकी टक्केवारी असल्याने गाव पुढार्‍यांच्या अस्तित्वाच्या लढाईत मतदार कुणाच्या बाजुने कौल देणार हे येत्या 3 डिसेंबर रोजी मतमोजणी निकालानंतर स्पष्ट होणार असुन तोपर्यंत गावपातळीवरील गावपुढार्‍यांची धाकधुक चांगलीच वाढणार आहे.

इंदापूर शहरात 6 बुथवर एकुण 4227 इतके मतदान होते.त्यापैकी 2339 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तर बावडा 4 बुथ, एकुण मतदाण 2739 पैकी झालेले मतदान 1585 व टक्केवारी 57.87 इतकी आहे., निमगाव केतकी 3 बुथ, एकुण मतदाण 1974, पैकी 1169 मतदान झाले. तर 59.22 टक्केवारी आहे. सणसर बुथ 2, एकुण मतदान 1006 पैकी 613 मतदान झाले. व 60.93 टक्केवारी. तर भागवण एक बुथ, एकुण मतदान 911, पैकी झालेले मतदान 494 व 54.23 टक्केवारी असुन तालुक्यात पदवाधरांचे एकुण मतदान 10,857 इतके असुन त्यापैकी 6254 इतके मतदान झाले आहे. तर तालुक्याची एकुण 57.60 इतकी टक्केवारी आहे.तर शिक्षक ममतदारांचे इंदापूर 433 पैकी 360 मतदान झाले असुन 83.14 टक्के, निमगाव 223 मतदान पैकी 209 पूर्ण. व 93.72 टक्के, सणसर 319 मतदान पैकी 257 व 80.56 टक्के, सणसर,154 पैकी 128 व 83.12 टक्के., भिगवण 95 मतदान पैकी 70 पूर्ण व 73.68टक्के. तर तालुक्यातील शिक्षकचे एकुण मतदान हे 1224 असुन त्यापैकी 1024 मतदारांनु हक्क बजावला असुन 83.66 इतकी टक्केवारी असल्याने वाढला टक्का कुणाला बसेल धक्का याचे उत्तर दानांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर मीळणार असल्याने मतदारांमधील उत्सुकता शागेला पोहचली आहे.

You might also like