Video : 85 लाखाचं ‘केळ’ खाल्लं ‘या’ व्यक्तीनं, शेअर केला व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका माणसानं 85 लाखांहून अधिक किंमतीचं केळ खाल्लं आहे. अमेरिकेतील आर्ट शो मध्ये हे केळ ठेवण्यात आलं होतं. टेपच्या मदतीनं हे केळ भींतीवर चिटकवण्यात आलं होतं. एका व्यक्तीनं हे केळ खाल्ल्यानंतर मात्र कोणताही विवाद झाला नाही.

हे केळ इटलीतील आर्टीस्ट मौरिजिओ केटलनचं आर्ट वर्क होतं. त्यांनी हे केळ एका फ्रेंच माणसाला 85 लाखांहून अधिक किंमतीला विकलं. ज्याला नंतर या प्रदर्शनात जागा देण्यात आली होती.

अमेरिकन आर्टीस्ट असल्याचं सांगणाऱ्या डेव्हीड डटुनानं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलं आहे. ज्यात ते भींतीवरून हे केळ काढून ते खाताना दिसत आहेत. यावेळी ते म्हणतात, “आर्ट परफॉर्मंस, भुकेला आर्टीस्ट. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं.” डेव्हीड डटुना यांनी हे केळ खाल्ल्यानंतर 15 मिनिटांत तिथे दुसरं केळ लावण्यात आलं.

केळाचं आर्ट बनवणाऱ्या मौरिजिओ केटलन तेच आर्टीस्ट आहेत ज्यांनी 18 कॅरेट सोन्याचं टॉयलेट तयार केलं होतं आणि त्याचं नाव अमेरिका ठेवलं होतं. या टॉयलेटची काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या Blenheim पॅलेसमधून चोरी झाली होती. या टॉयलेटची किंमत अंदाजे 35 ते 42 कोटी रुपये होती.

Visit : Policenama.com